तुमच्या शरीरातील कॅॅल्शियम कमी झालेय, तर हे घरगुती करा उपाय
धावपळीच्या युगात आपण थकतो. अनेकवेळी हाडे दुखतात. थकवा जाणवतो. हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. शर्करायुक्त पदार्थांमुळे (चॉकलेट,केक,कोल्ड्रीक्स इ.). शरीरात कॅॅल्शियमची कमतरता होते. मात्र , हे कॅॅल्शियम घरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते. त्यासाठी औषधाची गरज नाही. मुंबई :- धावपळीच्या युगात आपण थकतो. अनेकवेळी हाडे दुखतात. थकवा जाणवतो. हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. शर्करायुक्त पदार्थांमुळे (चॉकलेट, केक, कोल्ड्रिंक्स इ.) शरीरात कॅॅल्शियमची कमतरता होते. मात्र, हे कॅॅल्शियमघरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते. त्यासाठी औषधाची गरज नाही. दूध :- दूध कॅॅल्शियमचा सर्वात उत्तम स्त्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅॅल्शियम प्राप्त करू शकतात. दूधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅॅल्शियम जास्त फायदेशीर असते. दही :- दहीमध्ये भरपूर प्रमाणात आढळून येते. एका बाऊल दहीमध्ये ४०० मि.ग्रॅॅ. कॅॅल्शियम असते. दुधापासून तयार इतर पदार्थ उदा. पनीर, चीज सेवन करून कॅॅल्शियम मिळते. मसाले-तुळस :- ओव्याची फुले, दालचिनी, पुदिन...