दालचिनीचे ५ मोठे फायदे !


दालचिनीचे चे पुढील ५ फायदे :-  दालचिनी चवीला तिखट-गोड असते. दालचिनी उष्ण, दीपन, पाचक, मुत्रल, कपनाशक, स्तंभक गुणधर्माची आहे. मनाची अस्वस्थता कमी करते. यकृताचे कार्य सुधारणा करते. स्मरणशक्ती वाढवते. दालचिनीचे उष्मांक मूल्य ३५५ आहे. 


१) पचन विकार :-
पचन सुधारण्यासाठी आणि पोटाचा गॅॅस कमी करण्यासाठी दालचिनीचे ३        विविध प्रयोग.  

  • अपचन , पोटदुखी आणि अजीर्ण कमी होण्यासाठी दालचिनी, सुंठ, जिरे आणि वेलदोडे सम प्रमाणात घेऊन बारीक करून गरम पाण्यासोबत घ्यावे. 
  • दालचिनी, मिरपूड आणि मध हे मिश्रण जेवणानंतर घेतल्यास पोट फुगत नाही. 
  • दालचिनीमुळे मळमळ, उलटी आणि जुलाब थांबतात. 

२) सर्दीसाठी :- 

  • चिमुटभर दालचिनी पूड पाण्यात उकळून त्यात चिमुटभर मिरीपूड आणि मथ टाकून घेतले असता जुनाट सर्दी, सुजलेला घसा आणि मलेरिया कमी होतो.  

३) स्त्रीरोग :-

  • अंगावरून जाणे, गर्भाशयाचे विकार आणि गनोरिया यावर दालचिनी उपयुक्त आहे. 
  • प्रसुतीनंतर महिनाभर दालचिनीचा तुकडा चघळल्याने लवकर गर्भ धारणा होत नाही. 
  • दालचिनीमुळे स्तनातील दुध वाढते. गर्भाशय संकोच होतो.   

४) स्वयंपाकाची लज्जत वाढवण्यासाठी :- जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी                      दालचिनीचे २ प्रयोग.  

  • दालचिनीची पाने आणि अंतर्साल केक , मिठाई आणि स्वयंपाकाची लज्जत वाढवण्यासाठी वापरतात. 
  • दालचिनीचे तेल सुगंधी द्रव्यात, मिठीत आणि पेयात वापरतात. 

५) इतर उपयोग :- 

  • थंडीमुळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटून लेप लावावा. 
  • मुख दुर्गंधी आणि दातासाठीच्या औषधांमध्ये दालचिनी वापरतात. 
  • मुरुमे जाण्यासाठी दालचिनीचे चूर्ण लिंबाच्या रसात मिसळून लावावे. 
  • गोवरप्रतिबंधक म्हणून दालचिनी वापरली जाते. 
  • दालचिनी, मिरपूड आणि मध हे मिश्रण जेवणानंतर घेतल्यास पोट फुगत नाही. 
* दालचिनीची खबरदारी घ्यावी :- 

१) दालचिनी उष्ण असल्याने उन्हाळ्यात वापर कमी करावा. 

२) दालचिनीमुळे पित्त वाढू शकते. 

३) उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ला घ्यावा.  



Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स