अपचनावर खरबूज आहे गुणकारी....
- भरपुर जीवनसत्त्व आणि खनिज असलेले हे फळ आरोग्याच्या दृष्टीने उत्तम
खरबूज हे फळ जगात 'मस्कमेलन' नावाने ओळखले जाते. भारत, इराण आणि आफ्रिकेत प्रामुख्याने याचे पीक घेतले जाते. पाणीदार असल्याने शरीराचे तापमान काहीसे थंड ठेवायला मदत होते. भरपूर जीवनसत्त्व आणि खनिज असलेले हे फळ आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. म्हणून उन्हाळ्यात सेवन करणे अधिक चांगले असते. याचे इतर फायदेही जाणून घेऊया...
> बद्धकोष्ठतेच त्रास असलेल्यांनी आवर्जून खावे. यात भरपूर पाणी आणि पाचक फायबर असल्याने आन पचते.
> भूक लागत नसल्यास हे फळ खायला द्यावे. भूक वाढते.
> अतिसार होत असल्यास खरबुजाच्या फोडीवर काळी मिरी, आल पावडर, सैंधव मीठ, जिरा पावडर घालून खाल्ल्यास लगेच आराम पडतो.
> नियमित सेवन केल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होतो. यात भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन, फॉलिक अॅॅसिड, सी, ई, के आणि ए अशा जीवनसत्त्वांचा भरणा असल्याने त्वचा मृदू, चमकदार व्हायला मदत होते. शुष्क त्वचा, काळे डाग आदी विकारांवर गुणकारी ठरते.
> यात मोठ्या प्रमाणात पोटॅॅशियम असल्याने मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांना होणाऱ्या अतिरिक्तस्त्रावापासून आराम मिळतो.
> प्रसूतीनंतर दुध वाढण्यास मदत होते. लोह आणि फॉलिक अॅॅसिड असल्याने बाळ आणि माता दोघांसाठी फायदेशीर ठरते. गरोदरपणात सुरुवातीच्या काळात येणारा सकाळचा थकवा कधी होण्यास मदत होते.
> लो कॅॅलरी आणि उच्च डाएटरी फायबर, पाणी, खनिज आणि जीवनसत्त्वांचा भरणा असल्याने मधल्या न्याहरीच्या वेळी या फळाचा आवर्जून समावेश करावा.
> वजन नियंत्रित करण्यासही मदत होते.
> खरबूज रक्तशुद्धीकरणाचे काम करते.
> उन्हाळ्यात दररोज एकदा खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
> मेंदूचे आरोग्य सुधारून स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
या पद्धतीने आपल्याला अपचनावर खरबूज हा गुणकारी औषध म्हणून ठरतो.

Comments
Post a Comment