पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्याचे घरगुती उपाय !


          लाल रक्त्पेशींंप्रमाणेच पांढऱ्या रक्तपेशी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पडतात. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवून संक्रामक रोगांपासून आपला बचाव करण्याच महत्त्वाच काम या पांढऱ्या रक्तपेशी करतात. 

आज या लेखात जाणून घेऊया पांढऱ्या पेशी वाढवण्याचे काही घरगुती उपाय :- 

         आपण आजारी पडतो, कधी आपल्यातील प्रतिकारकशक्ती खूप कमी होते. त्यावेळी डॉक्टर सांगतात की तुमच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत. मुळात चांगल्या आरोग्यासाठी पांढऱ्या पेशी संतुलित प्रमाणात असण महत्त्वाच असत. मग आपण औषधे घेतो. 

         काहीवेळा या पेशी काही नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करून, म्हणजे आहारात काही बदल करून वाढवता येतात. मुळात यासाठी योग्य तो आहार घेतला किंवा आपल्या घरातच उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर केला तर पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यासाठी औषधांचा मारा करण्याची वेळच येणार नाही. 

        डेंगू, मलेरिया या आजारात या पेशी कमी होतात. जाणून घेऊयात या पांढऱ्या पेशी म्हणजे काय? त्यांचे आपल्या शरीरातील महत्त्व. 

पांढऱ्या पेशी म्हणजे काय? त्यांचे शरीरातील काम काय? 

पांढऱ्या रक्तपेशी रक्तातच असतात. त्यांना वैद्यकीय परिभाषेत 'ल्युकोसाईट' म्हणतात. 

या पाच प्रकारच्या असतात. या पेशी आपल्या हाडांमध्ये तयार होतात. शरीरातील विषाणू आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी या पेशी काम करतात. 

या पेशींच्या कमतरतेमुळे प्रतिकारकशक्ती कमी होते. त्यासाठी शरीरात या पेशी कमी असल्या तर काही संक्रमित आजार होण्याचा संभव असतो. 

विषाणूंशी सामना करण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे, आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या योग्य प्रमाणात असली पाहिजे . निरोगी आणि प्रतिकारशक्ती चांगली असणाऱ्या माणसाच्या शरीरात याचे पप्रमाण ४००० ते ११,००० मायक्रोलिटर एवढी असते. 

त्यामुळे या पांढऱ्या पेशी कशा वाढवल्या पाहिजे, यासाठी काही उपाय आज आपण पाहूया.
 

१) विटामिन ई - विटामिन 'ई' च्या कमतरतेमुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात. त्यासाठी मोड आलेली कडधान्ये आहारात वापरावीत. विटामिन 'ई' च्या सेवनामुळे हृदयरोग, कॅॅन्सर इत्यादी आजार होण्याची शक्यता ५०% कमी होते. वैद्यकीय सल्ल्यानुसार आहारात रोज ६०% विटामिन 'ई' घेतले गेले पाहिजे. जर तुम्ही मद्यपान, तंबाखू, सिगरेट अशा व्यसनाच्या शौकीन असाल तर मात्र ही मात्र वाढवली पाहिजे. मुळात व्यसनांपासून दूर राहणे हेच कधीही हितावह. 

२) विटामिन 'सी' - विटामिन 'सी' हे आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याच्या सेवनाने शरीरातील प्रतिकारशक्ती परिणामकारकरीत्या वाढते, आणि म्हणूनच कोणत्याही आजारी व्यक्तिला लिंबू-पाणी, संत्री रस प्यायला सांगितले जाते. 

३) ब्रोकोली - 'ब्रोकोली' ही भाजी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पांढऱ्यापेशींसाठी उपयुक्त आहे. यामध्ये विटामिन 'सी' आणि विटामिन 'ए' असते. त्यामुळे याचा वापर आहारात केला जावा. तसेच ही भाजी जास्त न शिजवल्यास तिच्यातील पोषकतत्व टिकून राहते. तसेच याची कोशिंबीर किंवा सॅॅलड करून खाऊ शकता. ब्रोकोली भाजी प्रतिकारशक्ती वाढवते. 

४) लाल शिमला मिरची ( ढोबळी मिरची) - दिसायला अगदी लाल असली तरी हिच्यात असणारे अँँटिऑक्सिडण्टस पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी महत्त्वाचे असतात. विटामिन 'सी' आणि बिटाकेरोटीनने भरपूर असणारी ही लाल शिमला मिरची आहारात वापरली पाहिजे. याची भाजी करून तुम्ही खाऊ शकता किंवा ग्रेव्हीमध्येही वापर करू शकता. 

५) पालक - पालकाची हिरवीगार भाजी तर पौष्टिकतेने भरपूर आहे. यामध्ये विटामिन 'सी',  बिटाकेरोटीन, अँँटिऑक्सिडण्टस प्रमाण खूप असल्याने डॉक्टर पालकाच्या सूप प्यायल्याने आजारी पडण्याची शक्यता कमी होते.

६) दही - प्रभावी अँँटिऑक्सिडण्ट म्हणून प्राचीन काळापासून दह्याचा वापर केला जात आहे. दह्यामध्ये विटामिन 'सी', कॅॅल्शियम, विटामिन 'डी' भरपूर प्रमाणात असते. रोज ताज्या दुधाच्या दह्याचा वापर आहारात केल्याने तुमची कार्यक्षमता टिकून राहते. तुम्ही फ्रेश राहता आणि बाहेरील संक्रमणापासून स्वत:चा बचाव करू शकता. 

७) ग्रीन टी आणि बदाम - 'ग्रीन टी' आणि 'बदाम' यांचे सेवन रोज केल्याने तुमच्यातील प्रतिकारशक्ती वाढते. ग्रीन टी तुम्हाला फ्रेश ठेवते. हृदयरोग आणि कॅॅन्सर सारख्या आजारांनाही दूर ठेवते. बदामाच्या रोजच्या सेवनाने तुम्हाला प्रोटीन आणि फायबर मिळतात. तसेच तुमच्या शरीराला पुष्टता प्राप्त होते. तुमची स्मरणशक्ती वाढण्यासाठीही बदाम महत्त्वाचा आहे. 

पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी वरील आहारातल्या पदार्थांचा तुम्ही वापर करू शकता. याच्यासोबतच तुम्ही काही आणखीही उपाय करू शकता. ते पुढीलप्रमाणे... 

१) भुजंगासन :- नियमित योगासने केल्याने तुम्ही आजारांपासून दूर राहता. भुजंगासनाने आसनाने तुमच्या गळ्यातील 'थाईम ग्रंथी' सक्रिय होतात. तसेच तुमच्यातील प्रतिकारशक्ती वाढते. या ग्रंथी आपल्याला आरोग्य अनेक संक्रमणांपासून दूर ठेवतात. दोन्ही हात जमिनीवर टेकवून, पाय मागे करून गळ्याचा भाग नागाच्या फण्यासारखा वर करून हे आसन करतात. 

२) भरपूर पाणी पिणे :-  आपल्या शरीरातील प्राणवायूचे अर्थात ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहण्यासाठी भरपूर आणि शुद्ध पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरात साधारणपणे रोज कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी जाणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही लिंबूपाणी, ग्लुकोजचे पाणी, नारळ पाणी सुद्धा पिऊ शकता. 

३) व्यसनांपासून दूर राहणे :- तुम्ही जर मद्यपान, सिगरेट अशी व्यसने केल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते. इतर आजारांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती कमी होते. तसेच आपल्या शरीराला कमीत कमी ७ ते ८ तास शांत झोपेची आवश्यकता असते. 

४) तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्यावे :- पांढऱ्या रक्तपेशी कमी होण्याचे एक कारण हे कॉपर डिफिशिअन्सी सुद्धा असू शकते. म्हणून तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पिणे हे आयुर्वेदात सुद्धा हिरकारी मानले गेलेले आहे. 

         आपण आपल्या शरीरासाठी हे सगळे कराच पण त्यासोबतच तुमची रोजची दिनचर्या आरोग्यपूर्ण ठेवा. 

         योगासन, व्यायाम, आहार चांगला असेल तरच तुमची प्रतिकारशक्ती अबाधित राहणार आहे. तुम्ही निरोगी राहाल. वरील सांगितलेल्या नियमांचा आणि आहाराचा उपयोग करून प्रतिकारशक्ती वाढवा आणि विषाणूच्या संक्रमणाला दूर ठेवा. 

   

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips