तुमच्या शरीरातील कॅॅल्शियम कमी झालेय, तर हे घरगुती करा उपाय


धावपळीच्या युगात आपण थकतो. अनेकवेळी हाडे दुखतात. थकवा जाणवतो. हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. शर्करायुक्त पदार्थांमुळे (चॉकलेट,केक,कोल्ड्रीक्स इ.). शरीरात कॅॅल्शियमची कमतरता होते. मात्र , हे कॅॅल्शियम घरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते. त्यासाठी औषधाची गरज नाही. 

मुंबई :- धावपळीच्या युगात आपण थकतो. अनेकवेळी हाडे दुखतात. थकवा जाणवतो. हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. शर्करायुक्त पदार्थांमुळे (चॉकलेट, केक, कोल्ड्रिंक्स इ.) शरीरात कॅॅल्शियमची कमतरता होते. मात्र, हे कॅॅल्शियमघरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते. त्यासाठी औषधाची गरज नाही. 

दूध  :- दूध कॅॅल्शियमचा सर्वात उत्तम स्त्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅॅल्शियम प्राप्त करू शकतात. दूधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅॅल्शियम जास्त फायदेशीर असते. 

दही :- दहीमध्ये भरपूर प्रमाणात आढळून येते. एका बाऊल दहीमध्ये ४०० मि.ग्रॅॅ. कॅॅल्शियम असते. दुधापासून तयार इतर पदार्थ उदा. पनीर, चीज सेवन करून कॅॅल्शियम मिळते.
 

मसाले-तुळस :- ओव्याची फुले, दालचिनी, पुदिना, लसूण तसेच तुळस यासारखे मसाले न केवळ पदार्थांना विशेष प्रकारचा फ्लेवर आणि टेस्ट देतात, यातून कॅॅल्शियम मिळते. 

पालेभाज्या :- हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅॅल्शियम आढळून येते. पालक, शलजम, कोबी, मशरूम सलाड 

शेंगभाज्या :- शेंगभाज्या शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात. यामुळे शरीराला प्रोटीनसोबतच कॅॅल्शियम मिळते. 

संत्री-लिंबू :- संत्र, लिंबू यांसारख्या फळांमधून शरीराला कॅॅल्शियम तसेच व्हिटॅॅमिन डी आणि सी मिळते. डी व्हिटॅॅमिनचा विशेष गुण म्हणजे, हे शरीराला कॅॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते. 

सोयाबीन :- सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम स्त्रोत आहे. 

गुळ :- गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅॅल्शियम असते. परंतु कॅॅल्शियमच्या पूर्तीसाठी गुळाचे जास्त सेवन करणे ठीक नाही. गुळामध्ये कॅॅल्शियमसोबतच फोस्फोरससुद्धा असते. जे शरीरासाठी उत्तम मानले आणि हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतो. 

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips