Posts

उन्हाळ्यात त्वचेची ऍलर्जी आणि फंगल इंन्फेक्शन दूर करण्यासाठी घरगुती उपाय

Image
  कडक उन्हात त्वचेवर अनेक प्रकारच्या ऍलर्जी होऊ लागतात. उन्हाळ्यात काटेरी उष्णतेचा सर्वाधिक त्रास होतो.  घामामुळे बुरशीजन्य आणि बॅॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोकाही वाढतो.  उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी :             कडक उन्हात त्वचेवर अनेक प्रकारच्या ऍलर्जी होऊ लागतात. उन्हाळ्यात काटेरी उष्णतेचा सर्वाधिक त्रास होतो. घामामुळे बुरशीजन्य आणि बॅॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोकाही वाढतो. अनेकांना उन्हात त्वचेची ऍलर्जी होते. ज्या लोकांना त्वचेचे आजार आहेत त्यांना उन्हाळयात अनेक प्रकारच्या संसर्गाचा धोका असतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात त्वचेच्या स्वच्छतेची खूप काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात जास्त वेळ घामात राहू नका, घाम येणारे कपडे ताबडतोब बदला, कोरडे आणि सुती कपडेच घाला, उघडे हवेशीर शूज आणि चप्पल घाला. कोणत्याही प्रकारचा संसर्ग असल्यास अँँटी फंगल पावडर, साबण किंवा बॉडी वॉश वापरा. याशिवाय तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.  घामोळे :             उन्हाळ्यात घामोळे ही एक सामान्य समस्या आहे. काटेरी...

दिवसभर थकलेलं असतानाही रात्री झोप लागत नसेल तर हे आयुर्वेदिक उपाय करा

Image
         झोप आपल्याला निरोगी ठेवते आणि शरीराला प्रभावीपणे कार्य करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमचा मेंदू रात्री फक्त थोडा वेळच विश्रांती घेतो. अशा परिस्थितीत रात्री जागंं राहिल्यास मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते आणि कमजोर स्मरणशक्ती, लक्ष केंदित करण्यास समस्या, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आणि मूड बदल यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच दररोज रात्री ७ ते ८ तासांची झोप असणे गरजेचे असते.           आयुर्वेद डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांनी नुकतेच रात्री झोप न येण्याच्या समस्येवर नैसर्गिक आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. ज्यांना झोप न लागणे, मध्येच जाग येणे आणि सकाळी थकवा जाणवणे असे त्रास होतात त्यांच्या चंगल्या झोपेसाठी आयुर्वेदिक उपाय पुढीलप्रमाणे पादाभ्यंंग  रात्री झोप येत नसेल तर पादाभ्यंंगाचा सराव करा. यामध्ये पायाच्या दोन्ही तळव्यावर तेल लावा आणि नंतर काही वेळ दोन्ही पायांच्या तळव्यांना चांगला मसाज करा. यानंतर १ तासानंतर पाय पुसून घ्या किंवा पाण्याने धुवा. रोज रात्री असे केल्याने काही दिवसातच परिणाम दिसून येतील.  प्राणाय...

रक्त पातळ होण्यासाठी करा हा आयुर्वेदिक' घरगुती उपाय

Image
             व्यायामाचा अभाव बाहेरचे खाणे, अवेळी झोपणे आणि इतर कारणांनी अनेकांना रक्त घट्ट होण्याची समस्याही निर्माण झालेली असते. जर आपल्या शरीरातील रक्त घट्ट झाले, तर त्या माध्यमातून रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. आणि त्यामुळे ब्रेन स्ट्रोक, हार्टअटॅॅक, मधुमेह यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते.             त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त आपल्याला नियमितपणे सुरळीत ठेवावे लागते. जर आपण रक्त सुरळीत नाही ठेवले तर आपल्याला गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. यासाठी आपण काही घरगुती उपाय करून देखील यावर मात करू शकता. मात्र अनेकांना याचा आजार जडल्याशिवाय याचे गांभीर्य कळत नाही.            तसेच रक्त घट्ट होण्यासाठी कारणीभूत असलेले घटक देखील अनेक जण सोडत नाहीत. रक्त घट्ट होण्याचे कारण म्हणजे आपण सातत्याने हाय कोलेस्टेरॉल युक्त अन्न खात असतो. यामुळे आपल्या शरीरातील रक्त हे घट्ट होते. बाहेरचे खाणे म्हणजे तेलकट, तुपकट मसालेदार तिखट खाणे, तसेच जंकफूड खाणे, यामुळे देखील रक्त घट्ट होण्याची समस्या निर्मा...

शरीरातील रक्त वाढविण्यासाठी घरगुती उपाय

Image
  तुमच्या शरीरात जर रक्त किंवा हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी झाले तर त्याचे एक न अनेक दुष्परिणाम आहेत. शरीरातील रक्त किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यास थकवा लागणे, अशक्त पणा जाणवणे यांसारखे काहींच्या त्वचेवर काही परिणाम आढळून येतात, तर काही जणांचे विशेषतः प्रौढांचे हात पाय सुजण्यासारखे परिणाम होतात.या शरीरावरील दुष्परिणामा सोबतच  एनिमिया सारखे रोग देखील होऊ शकतात. रक्तवाढीसाठी किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी संतुलित आहारा बरोबरच काय खावे व काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे  मोड आलेले कडधान्य खाणे - रक्त वाढवणे एक उत्तम उपाय  मोड आलेली मटकी, हुलगे, चवली या रोज कडधान्य तुमच्या आहारात असायला हवेत. यामुळे शरीरातील रक्ताचे किंवा हिमोग्लोबिन प्रमाण वाढवण्यास मदत होते. आहारात टोमॅॅटो चा समावेश  दिवसेंदिवस आहारात टोमॅॅटो चा समावेश देखील होतो. लवकर रिझल्ट पाहिजे असल्यास टोमॅॅटो चा सूप किंवा ज्यूस रोज प्या. टोमॅॅटोमध्ये व्हिटॅॅमिन सी जे रक्त विकास अत्यंत गुणकारी असते.

मणक्याच्या आजारावर आयुर्वेदिक घरगुती उपाय | मणक्यातील गॅॅप

Image
           मणका आजारावर घरगुती उपाय पट्टा बसविणे, व्यायाम करणे, लांबचा प्रवास टाळणे, वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न पुर्वक आपण आपल्याकडे असणारी लक्षणे कारणे त्यावर करता येणारी योग्य उपचार पद्धती यासाठी आपल्याला योग्य अशी घरगुती आयुर्वेदिक उपचारासाठी पद्धत अवलंबून वेदना दूर करता याव्यात. मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार   * मणक्याच्या आजाराची कारणे :-             मणक्याचा आजार उद्धवल्यास सतत वेदनादायक प्रवास होत असतो मुख्य लक्षण म्हणजे मणक्यांची झीज होणे होय. मणक्यांची झीज जास्त होत राहतील तितकी लक्षणे मोठ्या प्रमाणात वाढत राहतात.  मणक्याच्या आजाराची कारणे :-  १) व्यायामाची आवड नसेल किंवा व्यायाम करण्यासाठी योग्य वेळ मिळत नसेल तसेच तुम्हांला व्यायामाचा कंटाळा, अभाव.  २) कोणतेही बैठे काम करताना तुम्ही नीट बसत नसताल तर.  ३) तुम्ही मांडी घालून बसला असताल किंवा तुम्हांला खुर्चीत बसायची सवय असेल तर तुम्ही पुढे वाकून बसण्याची सवय असेल तरीही आजार होऊ शकतो.  ४) तुम्ही कामानिमित्त चालताना पाठ सरळ न ...

कांजण्या आजार म्हणजे काय व कांजण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

Image
          कांजण्या म्हणजे काय :- कांजण्या हा विषाणूपासून होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. कांजण्या आजारास (चिकनपाॅॅक्स) किंवा व्हॅॅरिसेला या नावानेही ओळखला जातो. कांजण्या आजाराची लागण ही प्रामुख्याने लहान मुलांमध्ये अधिक झालेली आढळते. या आजारात शरीरावर खाज सुटणारे लालसर फोड येत असतात. कांजण्या का व कशामुळे होतात, कांजण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपचार अशी कांजण्या या रोगाची सर्व माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी या लेखात दिली आहे.  कांजण्या या रोगाची कारणे :- कांजण्या आजार हा व्हारसमुळे होतो. व्हॅॅरिसेला-झोस्टर व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे कांजण्या आजाराचा संसर्ग होत असतो. याशिवाय कांजण्या असलेल्या व्यक्तीकडून याची लागण दुसऱ्याला होऊ शकते. अशाप्रकारे कांजण्या आजार होत असतो.  कांजण्या रोग कसा पसरतो ?              कांजण्या हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असते. कांजण्याची लागण झालेल्या रुग्णाच्या खोकला, शिंका, लाळ,रुग्णाचे दुषित कपडे किंवा रुग्णाच्या अंगावरील फुटलेल्या फोडा...

फक्त गर्भधारणेमुळेच नाही तर 'या' कारणांमुळे देखील अनियमित होऊ शकते मासिक पाळी !

Image
              मासिक पाळीशी निगडीत असणारी प्रत्येक गोष्टी थेट स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम करते. त्यामुळे मासिक पाळीबाबत संपूर्ण स्त्रीला माहित असणे अत्यंत गरजेचे असते. कारण जर तुमची मासिक पाळी अनियमित झाली किंवा एखाद वेळी चुकली तर तुम्ही गरोदरच आहात असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही. तर त्यामागे असतात ही काही कारणे, जाणून घ्या कोणती!                  कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात एका विशिष्ट वयानंतर मासिक पाळी महत्वपूर्ण स्थान घेते. ही मासिक पाळी वेळेत आली आणि वेळेत संपली कि स्त्रीला कोणतही टेन्शन राहता नाही. पण जेव्हा मासिक पाळी येत नाही तेव्हा मात्र ती गोष्ट जास्त चिंतेची असू शकते. आपल्याकडे असा समाज रूढ झाला आहे कि मासिक पाळी ही तेव्हाच थांबते जेव्हा स्त्री गरोदर असते. त्यामुळे जर स्त्रीचा संभोग झाला असेल, पण सारं काही सुरक्षित होऊनही जर मासिक पाळी थांबली तरी सुद्धा आपण गरोदर असल्याची भीती स्त्रीच्या मनात दाटते.                पण तुम्हाला माहित हा आहे का मासिक पाळी थ...