दिवसभर थकलेलं असतानाही रात्री झोप लागत नसेल तर हे आयुर्वेदिक उपाय करा


         झोप आपल्याला निरोगी ठेवते आणि शरीराला प्रभावीपणे कार्य करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमचा मेंदू रात्री फक्त थोडा वेळच विश्रांती घेतो. अशा परिस्थितीत रात्री जागंं राहिल्यास मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते आणि कमजोर स्मरणशक्ती, लक्ष केंदित करण्यास समस्या, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आणि मूड बदल यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच दररोज रात्री ७ ते ८ तासांची झोप असणे गरजेचे असते. 

         आयुर्वेद डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांनी नुकतेच रात्री झोप न येण्याच्या समस्येवर नैसर्गिक आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. ज्यांना झोप न लागणे, मध्येच जाग येणे आणि सकाळी थकवा जाणवणे असे त्रास होतात त्यांच्या चंगल्या झोपेसाठी आयुर्वेदिक उपाय पुढीलप्रमाणे

  • पादाभ्यंंग 

रात्री झोप येत नसेल तर पादाभ्यंंगाचा सराव करा. यामध्ये पायाच्या दोन्ही तळव्यावर तेल लावा आणि नंतर काही वेळ दोन्ही पायांच्या तळव्यांना चांगला मसाज करा. यानंतर १ तासानंतर पाय पुसून घ्या किंवा पाण्याने धुवा. रोज रात्री असे केल्याने काही दिवसातच परिणाम दिसून येतील. 

  • प्राणायाम

जर तुम्हाला रात्री झोप न येण्याची समस्या होत असेल तर प्राणायाम तुमच्यासाठी झोपेचे औषध म्हणून काम करू शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चंदा अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने शरीराला आराम, बॉडी रिलॅॅक्स होते आणि चांगली झोप लागते. यामध्ये एका नाकपुडीतून श्वास घेणे आणि दुसऱ्या नाकपुडीतून श्वास सोडणे समाविष्ट आहे. दररोज झोपण्याच्या वेळी ५ मिनिटे त्याचा सराव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
 

  • मेडिकेटेड मिल्क 

निद्रानाशाच्या समस्येवर मेडिकेटेड मिल्क रामबाण उपाय म्हणून काम करते. ते तयार करण्यासाठी १ ग्लास दुधात १/४ चमचे जायफळ पावडर, चिमुटभर हळद, चिमूटभर वेलची पावडर मिसळा. आता ५ मिनिटे उकळवा. ते गाळून रोज झोपण्यापूर्वी सेवन करा. 

  • डाएट

एक्सपर्टस निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तीला आहार घेण्याच्या पद्धतीत काही बदल करण्याचा सल्ला देतात. यामध्ये संध्याकाळी चहा किंवा कॉफी टाळण आणि याव्यतिरिक्त सूर्यास्तापूर्वी जेवणे आणि गरम अन्न खाणे हे नियम समाविष्ट आहेत. 

  • लाइफस्टाइल

जर तुम्हाला झोप न लागण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही जीवनशैलीत हे काही बदल करून यापासून सुटका मिळवू शकता. यामध्ये जेवल्यानंतर १०० पावले चालणे, रात्री १० वाजण्यापूर्वी झोपणे, फोन, लॅॅपटाॅॅप , टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा म्हणजेच इलेक्ट्रोनिक डिव्हायसेसचा वापर झोपण्याच्या एक तास आधी न करणे आणि दररोज हे रुटीन फॉलो करणे यांचा समावेश आहे. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स