लांब, दाट आणि मजबूत केसांसाठी या पदार्थांचा करा आहारात समावेश
निरोगी केसांसाठी खाद्यपदार्थ : केसांना खोल पोषण देण्यासाठी आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करावा. केसांशी सबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते. केस गळणे आणि टाळूला खाज सुटणे कोणालाही आवडत नाही. केसांशी सबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी लॉक अनेक मार्ग वापरतात. अशा परिस्थितीत लोक महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात, केसांसाठी महागडी उपचार पद्धतीही वापरतात परंतु, त्यांचा प्रभाव केसांवर जास्त काळ टिकत नाही. अशा परिस्थितीत आरोग्यदायी पदार्थही महत्वाची भूमिका बाजावतात. रोजच्या आहारातच पोषण असलेले पदार्थ समाविष्ट केले तर. केसांच्या वाढीसाठी वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. आरोग्यदायी पदार्थ पोटात गेल्यानेच केसांची मुळे मजबूत होतात त्यामुळे केसही लांब होतात. निरोगी पदार्थ केसांना खोल पोषण देण्याचे काम करतात. लांब आणि निरोगी केसांसाठी तुम्ही विविध आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश क...