उन्हाळ्याचा होणारा त्रास
उन्हाळ्याचा त्रास हा सगळ्यांनाच होतो. पण लहान मुलांना त्रास हा त्यांना प्रत्येक वेळेला शब्दात मांडता येत नाही. त्यासाठी आपणच काही उपाय करावेत. उन्हाळ्यात करावयाचे उपाय
- उन्हाळ्यात लहान मुलांना भूक कमी लागते आणि तहान जास्त लागते. १ लिटर पाण्यात १ छोटा चमचा जिरे आणि धणे प्रत्येकी घालून हे पाणी उकळून मुलांना दिवसातून २-३ वेळा प्यायला द्यावे. यामुळे तहान लागणे कमी होते.
- उन्हाळ्यात घामोळ्याचा त्रास मुलांना होतो. त्यासाठी आठवड्यातून २ वेळा साबणाऐवजी कैरीचा गर वापरावा.
- कैरीचे पन्हे, लिंबाचे सरबत, शक्य असल्यास ताक हे मुलांना जास्त प्रमाणात प्यायला द्यावे.
- उन्हाळ्यात लहान मुलांना उष्णतेमुळे डोळे येण्याचा त्रास होतो. त्यासाठी १ छोटा कांदा बारीक किसून त्याचा २ थेंब रस दोन्ही डोळ्यात टाकावा. खूप आग होईल पण नंतर थंड वाटेल. ( हे औषध २ वर्षापासून सगळ्यांना उपयोगी आहे.)
- रोजच्या आहारामध्ये कच्चा कांदा आवर्जून खावा. त्यामुळे उन्हाळी लागणे, नाकातून रक्त येण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते.
- उन्हाळ्याच्या दिवसात पोटभर खाल्ल्याशिवाय बाहेर पाठवू नये.
- उन्हातून आल्यानंतर मुलांना लगेच पाणी पिण्यास देऊ नका. त्याआधी १ छोटा गुळाचा खडा खाण्यास द्या.
- उन्हाळ्यातल्या उन्हामुळे डोके दुखत असेल तर बडीशेप वाटून डोक्यावर लेप लावावा. डोके दुखणे थांबते

Comments
Post a Comment