पायाच्या टाचांना भेगा का पडतात ?
टाचांना भेगा पडण्याची सुरुवात कधी होते ? या प्रश्नाचे उत्तर सापडणे तसे कठीण आहे.पण आपण आपल्या पायाकडे नीट लक्ष दिले तर लक्षात येईल भेगा पडण्याचे पहिले लक्षण टाचांच्या कोपरापासून म्हणजेच कॅॅलेसिज म्हणतात, तिथे दिसू लागतात. या भागावर असलेली त्वचा कोरडी आणि जाड होऊ लागते. चालायला लागल्यावर टाचेच्या खाली असलेला त्वचेचा जाडसर भाग पसरू लागतो. यामुळे कॅॅलेसिजमध्ये क्रॅॅक्स येण्याचा त्रास वाढतो.
पायाच्या टाचांना भेगा पडण्याची सर्वसामान्यपणे काही कारणे आपण समजून घेऊयात :-
- बराच वेळ उभे राहिल्यामुळे होऊ शकतात.
- चप्पल न घालता चालणे.
- गरम पाण्यात बराच वेळ अंघोळ करणे.
- केमिकल बेस्ड साबणाचा वापर करणे.
- योग्य मापाचे बूट न घातल्यामुळे.
- थंड वातावरणामुळे हवेतील ओलावा कमी झाल्यामुळे.
पायाच्या टाचांना भेगा पडण्याची वैद्यकीय कारणे (Medical Causes Of Cracked Heels)
वरवर पाहता स्किन कोरडी पडल्यामुळे टाचेला भेगा पडतात असे आपल्याला वाटते. पण असे लक्षात आले की, हाय ब्लड शुगर आणि ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळे होणाऱ्या डायबिटीस मध्ये बऱ्याचदा स्किन ड्राय होते. यामुळे आपल्या नसांचे नुकसान होऊन टाचांना भेगा पडू लागतात. अनेकदा त्या व्यक्तीच्या लक्षातही येत नाही की त्याच्या टाचांना भेगा पडायला सुरुवात झाली आहे. स्कीनचा ड्रायनेस वाढवणाऱ्या आणि टाचांना भेगा पडण्यामुळे होणाऱ्या त्रासाला कारणीभूत अजूनही काही गोष्टींचा समावेश होतो.
- व्हिटॅॅमिनची कमतरता
- फंगल इंफेक्शन
- हाइपोथायरायडिज्म
- जुवेनाइल प्लांटर डर्मेटाइसिस
- सोरायसिस
- पामोप्लांंटर केराटोडर्मा
- लट्ठपणा
- वाढते वय
हा त्रास वाढू नये म्हणून वेळीच याकडे लक्ष द्यावे.
पायाच्या टाचांना भेगा पडण्याची सुरुवात झाल्याची लक्षणे काय आहेत?
पायाच्या टाचांना भेगा पडायला सुरुवात झाल्यावर तुम्हाला खालीलपैकी लक्षणे दिसू लागतात.
- स्किनचा पापुद्रा पडतो.
- खाज येते.
- खोलवर वेदना होतात.
- रक्त येणे.
- त्वचा लालसर होणे आणि जळजळ होणे
- जखम होणे
पायांच्या टाचेला भेगा पडण्यापासून कसे वाचवू शकतो? यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका आपल्या पादत्राणांची असते. जर आपल्याला टाचांना भेगा पडण्याचा त्रास होत असेल तर असे शूज वापरा जे आपल्या पायाला सगळीकडून व्यवस्थित फिट बसत असतील आणि आपल्या टाचांना सपोर्ट करतील.आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा असे शूज वापरा ज्याच्या हील्स रुंद असतील आणि टाचेच्या जागी कुशन मऊ असतील.
पायाच्या टाचांना भेगा पडण्यापासून वाचविण्याचे उपाय :-
- एकाच स्थितीत बराच काळ उभे राहणे किंवा बसणे टाळले पाहीजे.
- पायाची मांडी घालून बराच वेळ बसू नये.
- झोपण्यापूर्वी पायात जाडसर मोजे घालावे.
- जर तुम्हाला मधुमेह असेल तर दररोज पाय तपासा.
- चांगल्या क्वालिटीचे शूज घाला.
- दिवसातून 5 लिटर पाणी प्या.
- आंघोळ करताना पायाच्या टाचा प्युमिस स्टोनने घासून घ्या.
टाचेला पडणाऱ्या भेगांवर घरगुती उपाय :-१. पाय पाण्यात भिजवून डेड स्किन काढून टाकावी
पायाच्या घोट्यांंभोवतीची त्वचा सामान्यतः इतर त्वचेपेक्षा जाड आणि कोरडी असते.ही त्वचा दाबली गेली की तिला सहजपणे तडे जातात.पाय भिजवून माॅॅइश्चरायझिंग केल्याने आराम मिळू शकतो.
पाण्यात पाय भिजवण्यासाठी हे करावे :-
1. पाणी कोमटसर करून त्यात साबण मिसळून पाण्यात पाय २० मिनिटे भिजवा.
2. प्युमिस स्टोनने कडक त्वचा पूर्णपणे घासून घ्या.
3. मऊ कापडाने पाय नीट वाळवा.
4. भेगा पडलेल्या टाचांवर हिल बाम लावा.
5. पायात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पेट्रोलियम जेली लावा.
6. कोरडेपणा असल्यास पाय जास्त घासून पुसू नका.
२. लिक्विड बँँडेज
पायाच्या भेगा भरून काढण्यासाठी लिक्विड बँँडेज लावल्यामुळे ते पायाच्या भेगा सील करते. यामुळे क्रॅॅक वाढण्याची शक्यता कमी होते.हे उत्पादन स्प्रेच्या स्वरुपात येते. एकदा लावल्यानंतर त्याचा प्रभाव बराच काळ टिकतो. ज्यांच्या पायाला खोलवर भेगा पडल्या असतील आणि रक्तस्त्राव होत आहे अशा लोकांसाठी लिक्विड बँँडेज हे योग्य उत्पादन आहे. लिक्विड पट्टी नेहमी स्वच्छ आणि कोरड्या त्वचेवर लावावी. जेव्हा टाच फुटते तेव्हा हे कोटिंग त्वचेच्या पृष्ठभागावर दबाव टाकते.
३. मध
भेगा पडलेल्या टाचांवर मध नैसर्गिक उपाय म्हणून काम करू शकते. 2012 च्या अभ्यासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, मधामध्ये अँँटीबायोटीक गुणधर्म असतात. संशोधनात असे दिसून आले आहे की मध जखमा बरे करण्यामध्ये आणि स्वच्छ करण्यात मदत करू शकते. हे त्वचेला माॅइश्चरायझिंग करण्यास देखील मदत करू शकते. पाण्यात पाय भिजवल्यानंतर तुम्ही फुट स्क्रब म्हणून मध वापरू शकता किंवा रात्रभर फुट स्क्रब म्हणून लावू शकता. ४. खोबरेल तेल
ज्यांना ड्राय स्किन, एक्जिमा आणि सोरायसिस यासारखा त्रास असतो त्यांना खोबरेल तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. हे तुमच्या त्वचेला ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. कोमट पाण्यात पाय भिजवल्यानंतर खोबरेल तेल वापरणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. जर टाचेतल्या भेगांमधून रक्तस्त्राव किंवा इन्फेक्शन होऊ शकते असे वाटत असेल तरी खोबरेल तेलातील अँँटीबायोटीक आणि अँँटी मायक्रोबियल गुणधर्म त्याला प्रतिबंध करण्यात मदत करू शकतात. ५.इतर नैसर्गिक उपचार पायाच्या टाचांना पडलेल्या भेगांवर कोणकोणते उपाय करता येतील हे आपण पहिले.आता आपण काही सोपे घरगुती उपाय कोणते आहेत याविषयी जाणून घेणार आहोत. या सगळ्याच्या बाबतीत वैज्ञानिक प्रयोग करून काहीही सिद्ध झालेले नाही. पण हे उपाय अनेकांनी करून बघितले आहेत. ह्या उपायांमध्ये वापरले जाणारे जिन्नस त्वचेमध्ये ओलावा निर्माण करून मऊ करायला मदत करतात. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. - अॅॅपल सायडर व्हिनेगर पाय भिजवण्यासाठी वापरता येऊ शकते.
- ऑलिव्ह किंवा वनस्पती तेल माॅॅइश्चराईझ करण्यासाठी वापरता येते.
- कुस्करलेले केले माॅॅइश्चराईझ करण्यासाठी वापरता येते.
- तेलासोबत ओटमील मिसळवून स्क्रब करण्यासाठी वापरता येते.
- पॅॅरफिन व्हॅॅक्स ओलावा लॉक करण्यासाठी वापरता येते.
निष्कर्ष बऱ्याचश्या केसेसमध्ये भेगा पडलेल्या टाचा चिंतेचे कारण असतातच असे नाही. घरगुती उपायांनी भेगांचा त्रास कमी केला जाऊ शकतो. पण बरे होत नसल्यास निष्काळजीपणा करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. कारण न भरणाऱ्या टाचांच्या जखमा हे मधुमेहाचे लक्षण असू शकतात. सुरुवातीला यावर उपाय किंवा उपचार केले तर तुम्हाला लगेचच आराम मिळू शकतो. भेगा पूर्णपणे भरून निघायला काही दिवस किंवा अगदी आठवडेही लागू शकतात. यादरम्यान पायाला पूर्णपणे कव्हर करतील असे शूज वापरावे, यामुळे पायाच्या टाचांना पुन्हा भेगा पडणार नाही. तसेच त्वचा सुरक्षित करतील. टाचा हेल्दी राहण्यासाठी नियमितपणे फुटकेअरची सवय करून घ्या.
Comments
Post a Comment