उंबर वृक्ष


 

उंबराचे झाड खूप मोठे असते. हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फुट उंच असते. उंबराच्या झाडाला फुल कधी येतात हे कधीच दिसत नाहीत, असा आदिम समाजात समज आहे. उंबराच्या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यानंतर लाल रंगाची होतात. फळे गोल चिकूच्या आकाराची असते. उंबराची फळ माणसांसोबत जनावरेही आनंदाने खात असतात. या फळाच्या आत अळी सारखे काही प्रकार दिसतात. त्यामुळे पिकलेले उंबर फोडून खाण्यापेक्षा सरळ पूर्ण खाताना काहीही वाटत नाही. फळाचे मधून दोन तुकडे केल्यास एक तुकडा दुसऱ्या तुकड्यासोबत घासून खाल्ले तर चव अधिक चांगली येते. उंबराच्या झाडावर पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसतिस्थान असते.

उंबर हे त्यांचे खाद्य देखील असते. माकडे या झाडावर बसून निवांत उंबराची फळे खात असतात. गुरे-ढोरे-बकरे उंबराच्या झाडाखाली बसून पिकलेले फळे खाण्यासाठी ते पडण्याची वाट पाहत असतात. औषधी म्हणून या झाडाचा खूप मोठा उपयोग आदिम समजात होतो. जिथे उंबराचे झाड असते. तिथे पाण्याचा स्त्रोत हमखास असतो, अशी ग्रामीण भागात मान्यता आहे.
 

या झाडाची पाने सीताफळाच्या पानासारखे असून हे झाड दाट सावली देते. उंबराच्या दुधाचा वन औषधी म्हणून वापर करण्यात येतो. आदिम परिसरात बकरीला व्यवस्थित दुध आले नसल्यास या झाडाचे दुध काही औषधांसोबत दिल्यास दुधाच्या प्रमाणात वाढ होते. या व्यतिरिक्त धार्मिक कार्यात, मरण कार्यात या झाडाच्या पानांनी दुध शिंंपडून अखेरचा निरोप देण्याचे कार्य केले जाते. 

माणसाच्या जबड्याखाली किवा मानेच्या ठिकाणी गळे-गळेशा आल्यास उंबराच्या झाडाचे दुध पांढऱ्या कागदावर लेप लावून त्या ठिकाणी लावतात. उंबराचे वृक्ष हे अत्यंत गुणकारी असून या झाडाचे आदिम समुदायात महत्वाचे स्थान आहे. 

-चिन्ना महाका, हेमलकसा 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स