तोंड येणे यावर घरगुती उपाय...
आयुर्वेदानुसार, वाढणारी उष्णता व शरीरातील जास्तीचे पित्त यामुळे अंत:त्वचेला इजा होऊन तोंड येते. पोट साफ नसेल तर हे लवकर बरे होत नाही.
उपाय :-
- १०-१२ काळे मनुके रात्री पाण्यात भिजत घालावे. ते सकाळी बारीक चावून खावे.
- सकाळी-सायंकाळी एक-एक चमचा गुलकंद खावा.
- जखमांना ज्येष्ठमध किवा शुद्ध गेरूची पूड लावावी.
- अंजीर, द्राक्ष ही फळे खावीत. आहारात दुध, नारळ पाणी, कोथिंबीर यांचा समावेश असावा.
- रोज रात्री त्रिफळा चूर्ण घ्यावे.
- साधे उकडलेले जेवण घ्यावे व जागरण टाळावे.

Comments
Post a Comment