पित्त होण्याची कारणे , पित्ताची लक्षणे, त्यामुळे होणारे त्रास / आजार आणि त्यावरील घरगुती उपाय
पित्त होण्याची कारणे / असमतोलाची लक्षणे :
पित्त दोषाची शारीरिक लक्षणे -
- भूक आणि / तहान वाढणे.
- संसर्ग
- केस पांढरे होणे / गळणे
- भोवळ येणे आणि अर्धशिशी
- अचानक भयंकर उष्णता जाणवणे आणि शरीराला गारवा देणाऱ्या पदार्थाची निकड भासणे.
- श्वासात आणि शरीराची दुर्गंधी
- घश्याला कोरड पडणे.
- जेवणाची वेळ टाळण्यास मळमळ वाटणे
- निद्रानाश
- स्तनात / वृषणात नाजुकपणा जाणवणे
- वेदनादायी मासिक पाळीचा त्रास
- उताविळपणा
- निराशा
- अहंकारात वाढ
- अति ध्येयवादी
- संताप
- मत्सर
- तार्किक
- अस्थिर वर्तन
- परिपूर्णतेचा सोस
पित्तामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत.
- छातीत जळजळ
- उन्हाने त्वचेचा क्षोभ, इसब, मुरूम, त्वचेचे रोग
- आम्लदाह, पोटातील व्रण
- ताप
- रक्तात गुठळ्या आणि पक्षाघात
- मूत्रपिंडाचा संसर्ग
- थायराॅइड ग्रंथीचे विकार
- कावीळ
- सांधेदुखी
- अतिसार
- जुनाट थकव्याची लक्षणे
- आंंधळेपणा
- रोगप्रतिकार प्रणालीचा आजार
पित्त कशामुळे होते :-
- पित्त वाढविणाऱ्या अन्नाचे सेवन (तिखट, आंबट, खारट, मसालेदार, तेलकट , प्रक्रिया केलेले पदार्थ आणि लाल मांस)
- कॉफी, ब्लॅक टी, निकोटीन, अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थ
- उन्हात सतत वास्तव्य
- भावनिक ताण
- अतिश्रम किंवा अतिआळस
पित्त झाल्यावर घरगुती उपाय :-
- योग्य आहाराचे सेवन करा.
- मध्यममार्ग निवडा
- चांगल्या गोष्टीचा आस्वाद घ्या.
- ध्यान करा
- योग
- आयुर्वेदिक औषधे
पित्ताचे शमन करणाऱ्या आहाराचे सेवन करा. दुध, तूप, लोणी हे उत्तमरीत्या पित्ताचे शमन करतात. आंबट फळांंऐवजी गोड फळे खा. मध आणि काकवी सोडून बाकी गोड वस्तूंचा वापर करू शकता.
मध्यममार्ग निवडा.
कार्यशीलता आणि विश्रांती ह्यात योग्य समन्वय साधा. कामातच फार गुंतून राहू नका किंवा खूप लोळणे टाळा.
चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्या.
नियमित आहार घ्या आणि चांगल्या संगतीत आणि निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा.
ध्यान करा.
ध्यान करा आणि आपल्या पित्त प्रकृतीच्या भरकटणाऱ्या मनाला स्थिर करा.
योग.
खालील योगासने पित्ताच्या असमतोलचा प्रभाव कमी करण्यास मदतीची ठरतात.
- मार्जारासन
- शिशु आसन
- चंद्र नमस्कार
- उत्कटासन
- भुजंगासन
- विपरीत शलभासन
- पश्चीमोत्तानासन
- अर्धनौकासान
- अर्धसर्वांगासन
- सेतुबंधासन
- शवासन
- योगिक श्वास
आयुर्वेदिक औषधे.
पित्ताचा समतोल साधणाऱ्या काही आयुर्वेदिक औषधांची नावे खाली दिली आहेत. कृपया या औषधांचे सेवन प्रशिक्षित आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्यानेच करावे.
- अम्ल पित्तादी वटी (अति आम्लतेसाठी)
- अविपत्तिकर चूर्ण (पाचन समस्या आणि अति आम्लतेसाठी)
- यष्टिमधु (एॅसिड पेप्टिक रोगासाठी, आम्लतेमुळे होणाऱ्या रोगांसाठी)
- निशमलाकि (अँटी-एलर्जी, असोशिकता निवारणासाठी)

Comments
Post a Comment