घशात अडकलेली वस्तू बाहेर पडत नाही, तर हे उपाय करा..
गुदमरत असलेली व्यक्ती खोकत असेल तर त्याला खोकू द्यावे. कारण त्यामुळे घशात अडकलेली वस्तू बाहेर फेकली जाऊ शकते. जर खोकून अडकलेली वस्तू बाहेर फेकली गेली नाही तर रुग्णाला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.
प्रथोमपचार :-
- गुदमरत असलेल्या व्यक्तीच्या मागे उभे राहून त्यांचे हात त्याच्या छातीच्या बाजूने पुढे आणा.
- हात एकात एक गुंतवा व अंगठ्याच्या मदतीने रुग्णाच्या घशाच्या खाली व छातीवर दाब द्या.
- हातातील जोर वाढवून तुमचे हात बाहेरच्या बाजूला ओढा व वरच्या जबड्यावर आत बाहेर असा भर द्या ही पद्धत तोपर्यंत वापरा जोपर्यंत रुग्णाच्या घशात अडकलेली वस्तू बाहेर पडत नाही.
- या संकटाला आपण तोंड देऊ शकत नाही असे वाटल्यास रुग्णाला त्वरित डॉक्टरकडे न्यावे.

Comments
Post a Comment