असे वाढवा लहान मुलांचे वजन

 

आपल्या मुलांचे वजन इतर मुलांच्या तुलनेत कमी आहे. असे अनेक पालकांना वाटते. याचे कारण जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. ते म्हणजे, मुलांचे खाणेपिणे योग्य नसल्याने वयाच्या मानाने त्यांचे वजन कमी होते. यामुळे त्यांच्या वजनासाठी मह्त्त्वाचे म्हणजे आहार होय. परंतु, मुले खाण्याच्या बाबतीत फार कंटाळा करतात. अशा वेळी त्यांना पुढील पदार्थ दिल्यास त्यांचे वजन संतुलित राहू शकते. 

मुलांचे वजन कमी असेल तर त्यांना सायीचे दुध द्या. त्यांना दूध पिणे आवडत नसेल तर शेक बनवून द्या. वजन वाढवण्यासाठी तूप व लोणी वरणात मिसळून देता येईल. 

सूप, सँँडव्हिच, खीर व शिरा - या चारही गोष्टी योग्य प्रमाणात दिल्यास आरोग्यासाठी लाभदायक आहेत. मुलेही हे पदार्थ आवडीने खातात. बटाट्यात भरपूर प्रमाणात कर्बोहायड्रेट असतात. बटाटा उकडून खायला द्या. 

मोड आलेल्या कडधान्यात मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. मुलांच्या वाढीसाठी हे लाभदायक आहे. मूल फार लहान असेल तर त्याला वरणाचे पाणी द्या. मुलाला स्वस्त बनवण्यासाठी त्याचा व्यवहार व दिनचर्येकडे लक्ष द्या. लहान मुलांना याची नितांत आवश्यकता असते. लहान बाळांना योग्य वेळी खुराक द्या व त्यांच्याकडे लक्ष द्या.    

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips