हे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाची चरबी झटपट होईल कमी.

 प्रमाणापेक्षा वजन वाढलं आहे किंवा दिवसेंदिवस मी लठ्ठ होत आहे हे वाक्य तुम्ही कित्येक लोकांच्या तोंडून ऐकल असेल, वाढलेलं वजन कमी करणं म्हणजे बहुतांश लोकांसाठी ही मोठी समस्या असते. वजन कमी करत असताना एक समस्या सतत भेडसावते टी म्हणजे पोटाची चरबी. पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागतो. 

पोटाची चरबी कशी कमी करता येईल यावर आयुर्वेदिक डॉक्टर श्याम वीएल यांनी एक सोपा मार्ग सांगितला आहे. या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लाइफ स्टाइलमध्ये काही बदल केले तर तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता. योग्य डाएट आणि व्यायामाच्या सहाय्याने तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेल्या महत्त्वपूर्ण टिप्स आपण जाणून घेऊया. 

  • मेथीच्या पाण्याचे सेवन 

वाढतंं वजन म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण. म्हणूनच वेळीच वजन कमी करण्यासाठी तुम्ही योग्य तो उपाय केला पाहिजे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरते ती मेथीच्या दाण्यांची पावडर. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यामध्ये मेथीच्या दाण्याची पावडर मिक्स करा. आणि सकाळी उठल्यानंतर काही न खाता नियमित या पाण्याचं सेवन करा. तुम्ही न चुकता या पाण्याचं सेवन केलात तर काही दिवसांमध्ये पोटाची चरबी कमी होण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल. 

  • जेवण्याची योग्य पद्धत 
वजन कमी करण्यासाठी तुमच्या नेहमीच्या सवयी,दिनक्रम बदलण्याचा निर्णय घेता. पण यामुळे मिळणारे फायदे आणि त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम याबाबत देखील माहिती असण गरजेचं आहे. जेवण्याची योग्य पद्धत देखील तुम्हाला माहिती असली पाहिजे. जेव्हा तोंडातील लाळेमध्ये कर्बोहायड्रेट जमा होत तेव्हा पचनक्रियेला सुरुवात होते. म्हणूनच जेवण पूर्णपणे चावून खाल्ल पाहिजे. जेवताना पत्येक घास तुम्ही चावत असाल तर त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. यामुळे तुमची पचनक्रिया देखील सुधारते. तसेच सॅॅटीटि हार्मोनमध्ये वाढ होऊन तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटत.

  • कोमट पाणी घ्या 

तुम्ही नेहमी थंड किंवा साधंं पाणी पिता. मात्र ही चूक कधीही करू नका. जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा. कोमट पाण्यामुळे शरीरामधील चयापचय शक्ती अधिक वाढते आणि यामुळे वजन कमी करण्यास भरपूर मदत मिळू शकते. तसेच शरीर हायड्रेट देखील राहते. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोटामध्ये जमा होणारी अतिरिक्त चरबी यामुळे कमी होण्यास अधिक मदत मिळते. 
  • वेगाने चाला

वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम हा अधिक महत्वाचा भाग आहे. नियमित व्यायाम, योग केल्यामुळे शरीर देखील निरोगी राहते. आयुर्वेदामध्ये देखील नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच तुम्ही वेगानं चालण देखील गरजेचं आहे. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास भरपूर मदत मिळू शकते. याव्यतिरिक्त तुम्ही योग आणि पायलेट्स देखील करू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे व्यायाम प्रकार अधिक फायदेशीर ठरू शकतात. 
  • आलं खा 

आलं सुकवा, या सुक्या आल्याची पावडर म्हणजे थर्मोजेनिकचं मुख्य स्त्रोत्र आहे. यामुळे तुमची वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास भरपूर मदत मिळते. पाण्यामध्ये सुक्या आल्याची पावडर मिक्स करा, आणि हे पाणी उकळवा. पाणी थोड्याफार प्रमाणात थंड झाल कि सेवन करा. तसेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी नियमित आहारामध्ये देखील तुम्ही आल्याचा समावेश करा.

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स