Posts

चरबीच्या गाठी येणे याची कारणे, लक्षणे व उपचार

Image
 अंगावर चरबीच्या गाठी येणे :-   शरीराच्या त्वचेवर होणाऱ्या चरबीच्या गाठींना लिपोमा (Lipoma) असे म्हणतात. त्वचेवर चरबीच्या गाठी येण्याची समस्या अनेकांना असते. शरीराच्या कोणत्याही भागावर अशा चरबीच्या गाठी होऊ शकतात. प्रामुख्याने मान, खांदा, हात, मांडी, पोट आणि पाटीवर अशा गाठी होत असतात. या लेखात डॉ. सतीश उपळकर यांनी चरबीच्या गाठी येण्याची कारणे, लक्षणे, उपचार आणि त्यावरील घरगुती उपाय याची माहिती सांगितली आहे.  ह्या चरबीच्या गाठी Bening ट्युमर प्रकारच्या असतात. त्यामुळे त्या गाठी कॅन्सरच्या नसतात. चरबीच्या गाठी या धोकादायक ठरत नसल्याने त्यावर उपचार करण्याचीही फार आवश्यकता नसते.  चरबीच्या गाठी का व कशामुळे येतात?  चरबीच्या गाठी नेमक्या कशामुळे येतात याची ठोस कारणे अद्यापही माहित झालेली नाही. ४० ते ६० वर्षाच्या व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात आढळतो. कुटुंबात चरबीच्या गाठी येण्याची अनुवांशिकता असणे, जेनेटिक फॅक्टर, हार्मोन्समधील बदल यांमुळे हा त्रास होऊ शकतो. याशिवाय Madelung's आजार, काउडन सिंड्रोम, गार्डन सिंड्रोम, एडीपोसिस डोलोरोसा यासारख्या आजारामुळे चरबी...

पित्तामुळे डोके दुखत असल्यास हे घरगुती उपाय करा.

Image
  पित्तामुळे डोके दुखणे :- पित्तामुळे अनेकांचे डोके दुखत असते. प्रामुख्याने वारंवार तिखट, तेलकट व मसालेदार पदार्थ खाण्याची सवय, बाहेरचे पदार्थ, चहा-कॉफी अतिरेक, अपुरी झोप, तणाव, वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर अशा अनेक कारणांनी पित्ताचा त्रास व त्यामुळे डोके दुखू लागते. यासाठी पित्तामुळे डोके दुखणे यावरील घरगुती उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.  पित्तामुळे डोके दुखण्याची करणे :-   वरचेवर तिखट, तेलकट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्याची सवय, मांसाहार, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, इडली, डोसा, ब्रेड यांसारखे पदार्थ अधिक खाणे.  चहा, कॉफीचे अतिप्रमाण.  उपवास करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे किंवा बराच वेळ उपाशी राहणे.   तंबाखू, सिगारेट, गुटखा, मद्यपान यांसारखी व्यसने.  मानसिक तणाव, राग.  वरचेवर डोके किंवा अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या घेणे.  अपुरी झोप किंवा अतिजागरण करणे यांमुळे पित्ताचा त्रास प्रामुख्याने होत असतो.  अशा विविध कारणांनी पित्त वाढते व त्यामुळे डोके दुखणे, ऍसिडिटी, छातीत जळजळ होणे, अल्सर य...

चिकनगुनिया आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

Image
  चिकनगुनिया आजार :- चिकनगुनिया हा एक विषाणुजन्य आजार असून तो डास चावल्याने होत असतो. चिकनगुनियामध्ये थंडी वाजून तीव्र ताप येणे, सांध्यांच्या ठिकाणी दुखणे अशी प्रमुख लक्षणे असतात. तसेच चिकनगुनिया आजारातून बरे झाल्यानंतर बरेच दिवस सांधे दुखू शकतात. चिकनगुनिया कशामुळे होतो, त्याची लक्षणे आणि चिकनगुनिया वरील उपचार याविषयी माहिती या लेखात डॉ. सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.               चिकनगुनिया होण्याची कारणे :- जेव्हा विषाणू बाधित एडीस इजिप्ती किंवा एडीस अल्बोपिक्टस ह्या जातीच्या डासाची मादी एखाद्या व्यक्तीस चावते त्यावेळी त्या डासातील विषाणू हे त्या व्यक्तीच्या शरीरात पसरतात. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला अशाप्रकारे चिकनगुनियाची लागण होत असते. तसेच काहीवेळा चिकनगुनिया संक्रमित रक्तातून देखील याची लागण होऊ शकते.  चिकनगुनिया संसर्गजन्य आहे का?  चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे जो संक्रमित डासांद्वारे मनुष्यांना होत असतो. हा आजार चिकनगुनियाच्या विषाणूने (CHIKV) बाधित असणाऱ्या डासांमार्फत होत असतो. चिकनगुनिया हा आजार एका व्यक्तीकडून...

उन्हात गेल्यावर चेहरा लाल पडतो ? ५ घरगुती उपाय, त्वचेची काळजी घ्या.....

Image
  उन्हाळ्यात अनेक समस्या उद्भवतात, ज्यात त्वचेसह शरीराला देखील हानी पोहोचते. उन्हात बाहेर गेल्यानंतर त्वचा टॅॅन पडते. त्वचा निस्तेज व कोरडी दिसू लागते. उन्हात गेल्यानंतर काहींची त्वचा लालसर पडते. हि समस्या खरतर, सेन्सिटिव्ह स्किनवर उद्भवते, ज्यामुळे त्वचेवर सनबर्न अथवा एलर्जिक रिअक्शन दिसून येतात.  त्वचा लाल पडल्यानंतर चेहऱ्यावर खाज, मुरूम, जळजळ इत्यादींची समस्या उद्भवते. आपल्या त्वचेवर देखील उन्हात गेल्यानंतर लाल रॅॅशेस पडत असतील तर, हे उपाय करून पाहा. या घरगुती उपायांमुळेउन्हात गेल्यानंतर त्वचेवर लाल रॅॅशेस पडणंं कमी होईल. व चेहऱ्यावर नवी ग्लो येईल ( How to get rid of redness on your face: 5 must-read tips ).  गुलाब जल :-  उन्हाळ्यात त्वचेवर लाल रॅॅशेस पडतात. जर या समस्येेपासून आराम हवा असेल तर, गुलाब जलचा वापर करून पहा. गुलाब जल त्वचेला थंडावा देतो. यासह त्वचेची जळजळ कमी होते. गुलाब पाण्यात अँँटििऑक्सििडंंटस असतात. ज्यामुळे कट, चट्टे आणि सनबर्न बरे होतात. यासाठी एका वाटीत काकडीची पेस्ट घ्या, त्यात गुलाब जल मिसळून मिश्रण तयार करा. ही पेस्ट त्वचेवर २० मिनिटासाठी लाव...

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय...

Image
   चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय -             सर्वांनाच आपल्या चेहऱ्यावरील डाग कोणालाही नको असतात. आपला चेहरा क्लीन, गोरा आणि चमकदार करण्यासाठी महिला बरेच  पर्यंत करतात. पण कधी आरोग्यामुळे तर कधी सूर्यकिरणांमुळे तुमच्या चेहऱ्यावर कधी ना कधीतरी डाग पडतातच. अशा डागांमुळे चेहरा खूपच काळसर दिसू लागतो. या अडचणींपासून सुटका हवी असल्यास, आम्ही तुम्हाला १२ घरगुती उपाय ( Chehryasathi Gharguti Upay ) सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा चेहरा क्लीन आणि चमकदार होण्यास मदत होईल. खर तर चेहरा निस्तेज होण्याची काही कारणे आहेत. धूळ, सतत प्रदूषण, चेहऱ्यावर तेल जमणे, चेहऱ्यावर घाण जमा होणे हि अत्यंत महत्व्वाची आणि मुख्य कारणे आहेत ( Common Causes Of  Dull Skin ) ज्यामुळे चेहरा निस्तेज होतो. पण यावर तुम्ही अगदी सहजपणाने घरगुती उपाय करून चेहरा अधिक स्वच्छ, गोरा आणि चमकदार बनवू शकतो. चेहरा उजळण्यासाठी घरगुती ( Chehra Ujalnyasathi Gharguti Upay ) आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत.   1. ऑलिव्ह ऑईल ( Oilve Oil ) :-         साहित्य...

डोळ्यांशी संबंधित आजार,रेटिनाच्या आरोग्यासाठी 'हे' आहेत प्रतिबंधात्मक उपाय...

Image
Helth Tips  : -          मानवी शरीराला एखाद्या आजाराची लागण झाल्यास त्या संदर्भात काळजी               घेण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जातात. मात्र, रेटिनाच्या संदर्भात            अजूनही तितक्या प्रमाणात जनजागृती झालेली नाही. रेटिनाचा आजारसुद्धा              दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या आजारांचे परिणाम अगदी कमी                वयापासूनच दिसू लागतात. मात्र त्याबाबत जागरुकता नसल्याने लक्षणे गंभीर           दिसू लागल्यावरच त्याकडे लक्ष दिले जाते.      एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी) आणि डायबेटिक रेटिनोपॅथी (डीआर) यांसारख्या आजारांचे योग्य वेळी अचूक व्यवस्थापन केले गेले नाही तर दृष्टी बऱ्यापैकी अधू होऊ शकते किंवा गमवावी लागू शकते. एएमडीमुळे मध्यवर्ती दृष्टीवर परिणाम होतो. हा आजार वयोवृद्ध व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. डीआरमुळे मधुमेहींच्या रेटिनातील रक...

पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय

Image
पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय  ‘हे केस असेच उन्हात नाही पांढरे झाले’, असं नेहमीच थोरामोठ्यांकडून बोललेलं तुम्ही ऐकलं आहे. पूर्वीच्या काळी ही गोष्ट नक्कीच योग्य होती, कारण तेव्हा वाढतं वय आणि अनुभवानुसारच केस पांढरे होत होते. मात्र आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात केवळ वयामुळं नाही तर तणाव आणि प्रदूषणामुळे लोकांचे केस लवकर काळे व्हायला लागले आहेत. सध्या उन्हातच केस पांढरे होत आहेत असं म्हटलं तर नक्कीच अति नाही होणार. मात्र असं असतानाही काळे आणि घट्ट केसच सर्वांना आवडत असतात. डोक्यावर एकही पांढरा केस दिसला तरीही पूर्ण दिवस चिंता करण्यात जातो की, केस पांढरे व्हायला लागले आहेत. त्यामुळे आपण अगदी मेंदीपासून डाय आणि हेअरकलर हा सगळ्याच गोष्टी हाताळून पाहतो. पण केस काळे व्हायला लागल्यावर तुम्हाला चिंता करायची खरंच गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला केस काळे करण्याचे असे काही उपाय सांगणार आहोत, जे तुम्ही आतापर्यंत करून पाहिले नसतील. तसंच याबरोबरच डाय केल्यामुळे काय नुकसान होतं आणि केसांना काळं राखून ठेवण्यासाठी कोणतं खाणं आवश्यक आहे याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत....