उन्हात गेल्यावर चेहरा लाल पडतो ? ५ घरगुती उपाय, त्वचेची काळजी घ्या.....

 

उन्हाळ्यात अनेक समस्या उद्भवतात, ज्यात त्वचेसह शरीराला देखील हानी पोहोचते. उन्हात बाहेर गेल्यानंतर त्वचा टॅॅन पडते. त्वचा निस्तेज व कोरडी दिसू लागते. उन्हात गेल्यानंतर काहींची त्वचा लालसर पडते. हि समस्या खरतर, सेन्सिटिव्ह स्किनवर उद्भवते, ज्यामुळे त्वचेवर सनबर्न अथवा एलर्जिक रिअक्शन दिसून येतात. 

त्वचा लाल पडल्यानंतर चेहऱ्यावर खाज, मुरूम, जळजळ इत्यादींची समस्या उद्भवते. आपल्या त्वचेवर देखील उन्हात गेल्यानंतर लाल रॅॅशेस पडत असतील तर, हे उपाय करून पाहा. या घरगुती उपायांमुळेउन्हात गेल्यानंतर त्वचेवर लाल रॅॅशेस पडणंं कमी होईल. व चेहऱ्यावर नवी ग्लो येईल ( How to get rid of redness on your face: 5 must-read tips ). 

गुलाब जल :- 

उन्हाळ्यात त्वचेवर लाल रॅॅशेस पडतात. जर या समस्येेपासून आराम हवा असेल तर, गुलाब जलचा वापर करून पहा. गुलाब जल त्वचेला थंडावा देतो. यासह त्वचेची जळजळ कमी होते. गुलाब पाण्यात अँँटििऑक्सििडंंटस असतात. ज्यामुळे कट, चट्टे आणि सनबर्न बरे होतात. यासाठी एका वाटीत काकडीची पेस्ट घ्या, त्यात गुलाब जल मिसळून मिश्रण तयार करा. ही पेस्ट त्वचेवर २० मिनिटासाठी लावून ठेवा. त्यानंतर त्वचा स्वच्छ करा. यामुळे त्वचेला थंडावा मिळेल. 

एलोवेरा जेल :- 

एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅॅमिन सी आणि ई तसेच बीटा- कॅॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. तसेच त्यात अँँटी - एजिंंग गुणधर्म असतात. ज्यामुळे रेड्नेस व रॅॅशेसपासून आराम मिळतो. यासाठी एलोवेरा जेल ३० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. या उपायामुळे चेहऱ्याला थंडावा मिळेल. 

बर्फ :-

बर्फाच्या वापरामुळे त्वचेवरील पोर्स घट्ट होतात. व चेहर्याला थंडावा मिळतो. यासाठी एका सुतीकपड्यात बर्फाचे तुकडे घ्या. व याने चेहऱ्याला शेक द्या. उन्हातून आल्यानंतर चेहऱ्याला शेक दिल्यामुळे त्वचेवर रेडनेस व रॅॅशेस उठणार नाही. 

सनस्क्रीन लावा :- 

उन्हाळ्यात बाहेर जाताना नेहमी सनस्क्रीन लावून बाहेर पडा. सनस्क्रीन आपली त्वचा कव्हर करते. सूर्यकिरणांमुळे त्वचा खूप निस्तेज व कोरडी पडते. यासह रॅॅशेस व रेडनेसची समस्या उद्भवते. त्यामुळे सनस्क्रीन लावून चेहर्याला कव्हर करा. 

तेलकट व स्पाईसी खान बंद करा :- 

उन्हाळ्यात शक्यतो थंड पदार्थाचे सेवन करा. कारण मसालेदार व तेलकट पदार्थामुळे शरीराला व त्वचेला हानी पोहोचते. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी नियमित ८ ग्लास पाणी प्या. पाण्यामुळे त्वचा साफ राहते. 

         

 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स