स्तनांचे आजार
स्तनांचे आजार दुधाच्या गाठी व जंतुदोष स्तनातल्या साध्या गाठी स्तनांचा कर्करोग नवा लेख 7-12-2010 स्तनांचा कर्करोग कारणे रोगनिदान विशेष सूचना पुरुषामध्ये स्तन नावापुरतेच असतात. म्हणूनच पुरुषांमध्ये स्तनांचे आजार क्वचितच होतात. क्वचित पुरुषांमध्येही स्तनांमध्ये गाठ किंवा कर्करोग होऊ शकतो. स्त्रियांमध्ये स्तनांचा आकार मोठा असल्याने आणि स्तनपानात त्यांचे प्रत्यक्ष काम असल्याने निरनिराळे आजार होतात. स्तनाची रचना म्हणजे संत्र्याप्रमाणे अनेक कप्पे असून त्यात मुख्यतः चरबी व दूध निर्माण करणा-या ग्रंथी असतात. प्रत्येक कप्प्यात दूध बोंडाकडे आणणारे दुग्धवाहिन्यांचे जाळे असते. दूध निर्माण करण्याची क्रिया स्तनपानाच्या काळात अखंडपणे वर्ष-दीड वर्ष चालू असते. यात मुख्यतः तीन प्रकारचे आजार आहेत. (1) दुधाच्या गाठी व जंतुदोष-गळू, इ., (2) स्तनांमधल्या साध्या गाठी, (3) स्तनांचा कर्करोग. दुधाच्या गाठी व जंतुदोष बोंडाला चीर पडली असेल तर दुखरेपणामुळे त्या बाजूला कमी पाजले जाते. यामुळे दुधाची गाठ बनू शकते व त्यात जंतुदोष होऊ शकतो. कधीकधी एखाद्या स्तनातले किंवा ...