Posts

स्तनांचे आजार

स्तनांचे आजार दुधाच्या गाठी व जंतुदोष स्तनातल्या साध्या गाठी स्तनांचा कर्करोग नवा लेख 7-12-2010 स्तनांचा कर्करोग कारणे रोगनिदान विशेष सूचना पुरुषामध्ये स्तन नावापुरतेच असतात. म्हणूनच पुरुषांमध्ये स्तनांचे आजार क्वचितच होतात. क्वचित पुरुषांमध्येही स्तनांमध्ये गाठ किंवा कर्करोग होऊ शकतो. स्त्रियांमध्ये स्तनांचा आकार मोठा असल्याने आणि स्तनपानात त्यांचे प्रत्यक्ष काम असल्याने निरनिराळे आजार होतात. स्तनाची रचना म्हणजे संत्र्याप्रमाणे अनेक कप्पे असून त्यात मुख्यतः चरबी व दूध निर्माण करणा-या ग्रंथी असतात. प्रत्येक कप्प्यात दूध बोंडाकडे आणणारे दुग्धवाहिन्यांचे जाळे असते. दूध निर्माण करण्याची क्रिया स्तनपानाच्या काळात अखंडपणे वर्ष-दीड वर्ष चालू असते. यात मुख्यतः तीन प्रकारचे आजार आहेत. (1) दुधाच्या गाठी व जंतुदोष-गळू, इ., (2) स्तनांमधल्या साध्या गाठी, (3) स्तनांचा कर्करोग. दुधाच्या गाठी व जंतुदोष बोंडाला चीर पडली असेल तर दुखरेपणामुळे त्या बाजूला कमी पाजले जाते. यामुळे दुधाची गाठ बनू शकते व त्यात जंतुदोष होऊ शकतो. कधीकधी एखाद्या स्तनातले किंवा ...

गर्भाशय बाहेर पडणे

गर्भाशय बाहेर पडणे रोगनिदान, लक्षणे कारणे उपचार शस्त्रक्रिया प्रतिबंधक उपाय नवा लेख 7-12-2010 गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेसाठी कारणे शस्त्रक्रियेच्या पद्धती गर्भाशय शस्त्रक्रिया टाळण्यासाठी काही पर्याय विशेष सूचना गर्भाशय बाहेर पडणे म्हणजेच अंग बाहेर पडणे. ही तक्रार मध्यम वयानंतर पण विशेषतः उतारवयातील स्त्रियांमध्ये आढळते. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातली मूळची जागा सोडून खाली उतरणे. ओटीपोटातले गर्भाशय धरून ठेवणारे स्नायू दुबळे झाल्यामुळे हा आजार होतो. जास्त बाळंतपणे, अशक्तपणा,उतारवय ही त्याची कारणे आहेत. खाली उतरण्याच्या पायरीनुसार तक्रारींचे स्वरूप कमी जास्त ठरते. रोगनिदान, लक्षणे पहिली पायरी  गर्भाशय खाली उतरताना आपसूकच योनिमार्गही सैल होऊन खाली उतरतो. योनिमार्ग खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. यामुळे लघवी अडकते किंवा आपसूक थोडी थोडी लघवी होण्याचा त्रास सुरु होतो. उतारवयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर योनिमार्ग/ गर्भाशय खाली उतरणे हे एक कारण असू असते. दुसरी पायरी गर्भाशय याप...

गर्भाशयाच्या गाठी

गर्भाशयाच्या गाठी गर्भाशयात अनेक प्रकारच्या गाठी येऊ शकतात. त्यात साध्या (म्हणजे कर्करोग नसलेल्या) गाठी आणि कर्करोगाच्या गाठी हे प्रमुख प्रकार आहेत. साध्या गाठी गर्भाशयाच्या आजूबाजूला पसरत नाहीत. वेळी-अवेळी होणारा रक्तस्राव हेच याचे प्रमुख लक्षण असते. कर्करोगाच्या गाठी असल्या तरी हेच लक्षण असते. साधी गाठ मोठी असेल तर हाताला ओटीपोटात  ' गोळा ' लागतो. या गोळयाचा आकार लहानमोठया कवठाइतकाही होऊ शकतो. कर्करोग असेल तर मात्र गोळा फार वाढायच्या आतच रुग्ण दगावण्याची शक्यता असते. कर्करोगाची बाकीची लक्षणे महत्त्वाची असतात. यात भूक ,  वजन कमी होणे , रक्तपांढरी ही लक्षणे विशेष असतात.

जननसंस्थेच्या गाठी व कर्करोग

जननसंस्थेच्या गाठी व कर्करोग गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग कारणे पूर्वनिदान लक्षणे व रोगनिदान उपचार नवा लेख 7 डिसेंबर 2010 गर्भाशयमुखाचा कर्करोग जननसंस्थेत ठिकठिकाणी मांसल गाठी तयार होऊ शकतात. योनिद्वार, योनिमार्ग, गर्भाशय, बीजनलिका, बीजांडे यापैकी कोठेही या गाठी होऊ शकतात. सर्व गाठींची तपासणी 'आतूनच' करावी लागते. सामान्यपणे तीन-चार प्रकार नेहमी आढळणारे आणि महत्त्वाचे आहेत : (1)गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग (2) गर्भाशयाच्या साध्या व कर्करोगाच्या गाठी (3)बीजांडाच्या साध्या गाठी (4)बीजांडाचे कर्करोग.  गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग भारतातील स्त्रियांच्या कर्करोगांत प्रमुख कर्करोग हा गर्भाशयाचा आहे. सहसा हा आजार जननक्षम आणि तरुण-मध्यम वयात येतो. सतत बाळंतपणे, लिंगसांसर्गिक आजार, अस्वच्छता, अनेक पुरुषांशी लैंगिक संबंध या काही बाबी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाशी जास्त निगडित आहेत. म्हणजेच अशा स्त्रियांना या कर्करोगाचा धोका जास्त असतो. पाळीच्या चक्रात अचानक झालेला बदल, अंगावर पांढरे/लाल किंवा दुर्गंधीयुक्त स्राव जाणे, लैंगि...

ओटीपोटात सूज

ओटीपोटात सूज ओटीपोटात सूज कारणे लक्षणे, चिन्हे व रोगनिदान दुष्परिणाम उपचार व प्रतिबंध बाळंतरोग ओटीपोटात सूज स्त्रियांच्या बाबतीत ओटीपोट म्हणजे गर्भाशय,गर्भनलिका, स्त्रीबीजांडे व आजूबाजूचा भाग (स्नायू,इत्यादी). ओटीपोटात सूज हा तसा दुर्लक्षित आजार आहे. आपल्या देशात स्त्रियांसाठी चांगल्या वैद्यकीय सेवा नसणे हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. या आजारांमध्ये आकस्मिक म्हणजे नवे जंतुदोष आणि जुने जंतुदोष असे दोन गट पाडता येतील. पहिल्या प्रकारात नीट उपचार न झाल्याने दुसरा प्रकार उद्भवतो. कारणे ओटीपोटात सूज येण्याचे मुख्य कारण म्हणजे जंतुदोष. या जंतुदोषाची अनेक कारणे आहेत ती अशी : बाळंतपण किंवा गर्भपाताच्या वेळी जंतुदोष होणे : बाळंतपणापेक्षा गर्भपात हे महत्त्वाचे कारण आहे, विशेषतः चोरूनमारून केलेले सदोष गर्भपात जंतुदोषास हमखास आमंत्रण देतात. पण वैद्यकीय गर्भपातातही जंतुदोषाचा थोडा धोका असतोच. (म्हणूनच गर्भपातापेक्षा संतती प्रतिबंधक जास्त चांगले.) ओटीपोटावरच्या शस्त्रक्रिया : सिझेरियनची शस्त्रक्रिया, स्त्रीनसबंदी, गर्भाशय काढून टाकणे, इत्यादी. लिंगसांसर्गिक आजार : परमा (गोनोर...

योनिदाह

योनिदाह रोगनिदान उपचार होमिओपथी निवड योनिदाह म्हणजे योनिमार्गाच्या आतल्या नाजूक त्वचेचा दाह. योनिदाहाची कारणे अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचे आणि जास्त आढळणारे प्रकार म्हणजे बुरशी, जिवाणू आणि ट्रायकोमोनास (एकपेशीय जीव) यामुळे होणारे योनिदाह. योनिमार्गात काही जैवरासायनिक कारणांमुळे सतत आम्लता असते. या आम्लतेमुळे योनिमार्गात सहसा इतर जंतू वाढू शकत नाहीत. एका विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मजंतूंच्या (लॅक्टोबॅसिलस) कायमच्या वस्तीमुळे अशी आम्लता राहते. गरोदरपण, बाळंतपणानंतरचा काही काळ, पाळी कायमची थांबल्यानंतरचा काळ हे कमी आम्लतेचे असतात. म्हणून या तीन काळात जंतुदोष होऊ शकतो. बुरशी, जिवाणू आणि ट्रायकोमोनास शिवाय आणखी काही जंतू विशिष्ट परिस्थितीत योनिमार्गात वाढू शकतात. परमा (गोनोरिया) या लिंगसांसर्गिक रोगजंतूमुळे कधीकधी योनिदाह होऊ शकतो. गर्भाशयाचा कर्करोग, ओटीपोटाच्या शस्त्रक्रिया,मधुमेह, इत्यादी कारणांनी इतर जंतुदोष होऊ शकतात.  रोगनिदान शक्यतो या दाहाचे नेमके कारण व प्रकार ओळखणे आवश्यक असते. कुस्को योनिदर्शकाच्या तपासणीत हा स्राव दिसून येतो. योनिदर्शकाच्या चमच्यासारख्या भागा...

अंगावरून रक्तस्राव

अंगावरून रक्तस्राव पाळीशिवाय रक्तस्रावाची इतर कारणे गर्भाशयाच्या गाठी जखमा रक्तस्रावाचा उपचार सोबतच्या तक्त्यात रक्तस्रावाच्या कारणांचे तीन प्रमुख गट दिले आहेत. एक गट म्हणजे पाळीशी संबंधित रक्तस्रावांची कारणे. यात होणारा रक्तस्राव संभाव्य तारखेस जोडून ,  थोडासा मागेपुढे होतो. यात मुख्यतः पाळीचा रक्तस्राव जास्त दिवस जात राहतो किंवा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणावर रक्तस्राव होतो. साधारणपणे पाळीचा रक्तस्राव दोन ते पाच दिवस टिकतो. सुरुवातीचा व शेवटचा ठिपके येण्याचा भाग सोडल्यास मधले एक-दोन दिवस एक ते दोन घडया रोज भिजेपर्यंत रक्तस्राव होतो. मासिक पाळीसंबंधी रक्तस्रावाचा विचार वेगळया प्रकरणात केला आहे. रक्तस्रावाचा दुसरा गट आहे-गरोदरपणाशी संबंधित असलेल्या आजारांचा. यात मुख्यतः निरनिराळया प्रकारचे गर्भपात (संभाव्य गर्भपात अटळ गर्भपात अपूर्ण गर्भपात दूषित गर्भपात आणि अस्थानी गर्भ) आणि गर्भाशयातील वारेशी संबधित रक्तस्राव येतात. यांचा विचार गरोदरपणाच्या प्रकरणात केला आहे. तिसरा गट आहे -गर्भाशयात गाठ किंवा कर्करोगामुळे होणारा रक्तस्राव आणि जखमा पाळीशिवाय रक्तस्...