वयाच्या ४०शी नंतर पुरुषांनी करावयाच्या वैद्यकीय तपासण्या


 

वयाच्या ४०शी नंतर पुरुषांनी करावयाच्या वैद्यकीय तपासण्या : 

रोग उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच दक्ष राहणे केव्हाही चांगले असते. यासाठी वेळोवेळी तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय तपासण्या करून घेणे गरजेचे असते. नियमित तपासण्या केल्यामुळे अनेक गंभीर विकारापासून दूर राहण्यास मदत होते. 

जस जसे वय वाढत जाते तसे शरीर अनेक रोगांना बळी पडू लागते. अनेक आरोग्याच्या समस्या उत्पन्न होऊ लागतात. यासाठी दक्षता म्हणून नियमित तपासणीचा अवलंब करावा.
 

रक्तदाब तपासणी : 

हृदयाच्या आरोग्यासाठी नियमित रक्तदाब तपासणी करून घ्यावी. यामुळे हृदयरोग, धमनीकाठीण्य, उच्चरक्तदाब, पक्षाघात यासारख्या गंभीर रोगांपासून सतर्क राहण्यास मदत मिळते. 

ब्लड कोलेस्ट्रोल टेस्ट : 

वर्षातून एकदा तरी कोलेस्ट्रोल चाचणी करून घ्यावी. यामुळे हृदयरोग, धमनीकाठीण्य, उच्चरक्तदाब, पक्षाघात यासारख्या गंभीर रोगांपासून सतर्क राहण्यास मदत मिळते. धुम्रपान करणाऱ्यांनी नियमित कोलेस्ट्रोलची तपासणी करून घ्यावी.

 

बल्ड ग्लुकोज टेस्ट : 

रक्तातील साखरेची तपासणी नियमित करावी. त्यामुळे मधुमेह आणि मधुमेहाच्या दुष्परिणामापासून रक्षण होण्यास मदत होते. 

PSA तपासणी : 

प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढत्या वयामुळे प्रोस्टेट वृद्धी, प्रोस्टेट कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते यासाठी Prostate Specific Antigen ( PSA test ) नियमित वर्षातून एकदा करून घ्यावी. 

मलाशय परिक्षण :

प्रोस्टेट कॅन्सर, मलाशयाचा कॅन्सर होण्यापेक्षा रक्षण होते. आतड्यातील रक्तस्त्रावाची माहिती मिळते. 

डोळ्यांची तपासणी : 

वाढत्या वयाबरोबर डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात. यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. मधुमेह, उच्चरक्तदाब यासारखे विकार असणाऱ्यांसाठी डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. 

तोंड, घसा आणि दाताची तपासणी : 

धुम्रपान, तंबाखू, पानसुपारी यांचे सेवन करणाऱ्यांनी नियमित तोंड, घसा आणि दाताची तपासणी करून घ्यावी. कारण त्यामध्ये तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स