जखम भरण्यासाठी करून पहा हे तीन उपाय


पावसाळ्याच्या दिवसांत लहानशी जखमही लवकर भरत नाही. जर जखम खोल असेल तर डॉक्टरांशी संपर्क करा. जखम जास्त खोल नसेल तर ही भरण्यासाठी हे तीन उपाय करा.

 


  • हळदीचा लेप : 
हळदीत अँँटी-बॅॅक्टेरिअल आणि अँँटी फंगल गुण असतात. जे जखमेवरील बॅॅक्टेरिअल इंफेक्शन दूर करतो. याचा लेप लावल्यामुळे जखम लवकर बरी होते. यासाठी हळदीत पाणी मिसळून या पेस्टला जखमेवर लावा. एका तासानंतर कोमट पाण्याने धुवा. याशिवाय हळदीचे दूधदेखील जखम भरण्यास तुमची मदत करेल. हे दूध रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या. 

  • पट्टी बांधा : 
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जखमेवर पट्टी बांधा. जर जखमेवर पट्टी चिकटत असेल तर अगोदर गरम पाणी आणि कापसाने स्वच्छ करून घ्या. जखम स्वच्छ केल्यानंतर यावर पावडर टाका. जेणेकरून जखम वाळेल आणि त्यानंतर औषध लावून पट्टी बांधा. पट्टी करण्यापूर्वी तुमचे हात धुवा आणि शक्य असल्यास गलव्स घालून पट्टी करा. जेणेकरून कोणत्याही प्रकारचे इंफेक्शन होणार नाही.
 

  • कडुलिंबाच्या पानांचा उपयोग : 
कडुलिंबाच्या पानांमध्ये अँँटी-बॅॅक्टेरिअल गुण असतात. यामुळे जुन्या आणि खोल जखमा बऱ्या होण्यास मदत होते. यासाठी कडुलिंबाच्या झाडाच्या सालीला पाण्यामध्ये उकळा आणि कोमट झाल्यावर या पाण्याने जखम स्वच्छ करा. आता कडुलिंबाच्या पानाला मधात मिसळून पेस्ट तयार करा. ही जखमेवर लावा आणि जखम ३ ते ४ तास उघडी ठेवा. ज्यामुळे जखम लवकर बरी होते. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स