पायाला भेगा का पडतात व पायाला भेगा पडणे यावरील घरगुती उपाय
पायाला भेगा का पडतात त्याची कारणे :-
पायाला भेगा पडण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये,
- अनवाणी चालण्याच्या सवयीमुळे,
- अधिक वेळ उभे राहण्याच्या सवयीमुळे,
- आरामदायी चपला किवा बूट न वापरण्यामुळे,
- हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंड वातावरणामुळे पायांची त्वचा कोरडी झाल्यामुळे.
- जास्त गरम पाण्याने अंघोळ करण्याच्या सवयीमुळे,
- पुरेसे पाणी न पिण्याच्या सवयीमुळे.
- व्हिटामिनच्या कमतरतेमुळे.
- मलम लावणे :- पायाला भेगा पड्ल्यास त्याठिकाणी औषधी मलम लावावे. त्यामुळे भेगा पडलेली त्वचा मॉइश्चराइज होऊन डेड स्कीन निघून जाते व त्वचा मऊसर होऊन भेगांचा त्रास कमी होतो. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून त्याठिकाणी औषधी मलम किंवा मॉइश्चरायझर क्रीम लावावी.
- मध :- पायाच्या भेगा भरून काढण्यासाठी मधातील अँटी-मायक्रोबियल व अँटी-बॅॅॅॅॅॅॅॅक्टेरियल गुणधर्म उपयुक्त ठरतात. तसेच त्वचा मॉइश्चराइज होण्यासाठीही मध उपयुक्त ठरते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून त्याठिकाणी मध लावावे.
- खोबरेल तेल :- खोबरेल तेलासाठी विशेष गुणधर्मामुळे त्वचा मॉइश्चराइज होत असते. यासाठीच कोरड्या त्वचेसाठी खोबरेल तेल वापरले जाते. त्यामुळे पायाला भेगा पडल्यास त्यावरही खोबरेल तेल खूप उपयोगी ठरते.
- कडुलिंबाचा रस :- पायाला भेगा पडल्यास कडुनिंबाची पाने बारीक वाटून त्याचा रस काढून पायांना लावल्यास भेगा कमी होतात.

Comments
Post a Comment