अनेक आजारांवर बहुगुणी अडुळसा आहे उपयुक्त
हिरवा आणि लाल अडुळसा असे याचे दोन प्रकार आहेत. साधारण ३०० मिमी पावसाच्या परदेशात लाल अडुळसा आढळतो. पानांची चव कडू असते. याचा उपयोग मुख्यत्वे कफ कमी करण्यासाठी होतो. संस्कृतमध्ये याला 'वासा' म्हणून संबोधले जाते. बाजारात मिळणारे वासा सिरप खोकल्यावर अतिशय गुणकारी असते. अडूळशाच्या पानांचा उपयोग औषधाप्रमाणे खत म्हणूनही होतो. शिंपी पक्षी याची दोन पाने शिवून घरटे बांधतात. अडूळशाच्या पांढऱ्या फुलांच्या तळाशी मध असतो. त्यामुळे मधमाशांना या झाडाचा उपयोग मोठया प्रमाणात होतो.
श्वास घेण्याचा त्रास हो असेल तर अडूशाच्या रसात मध आणि पिंपळी यांचे वाटण अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे श्वासाचा विकार बरा होण्यास मदत होते. श्वास लागणे कमी होते. तसेच नाकातून अथवा तोंडातून रक्त येत असल्यास अडुळसा उपयुक्त ठरतो. १० मी.लि. अडुळशाचा रस तितकीच खडीसाखर घालून द्यावा. रक्त पडण्याचे कमी होते. अडूळशाच्या पानांचा डोक्यावर लेप घातला असता नाकातून वाहणारे रक्त बंद होते.
.jpg)
Comments
Post a Comment