डोळ्याखाली काळे डाग का येतात व त्यावरील घरगुती उपाय


 

डोळ्याखाली काळे डाग होणे -
 

    डोळ्याखाली काळे डाग पडण्याची समस्या अनेकांना असते. आजची धावपळीची जीवनशैली, अयोग्य आहार, अपुरी झोप, प्रदूषण, मानसिक ताण या कारणांमुळे डोळ्याखाली काळे डाग येत असतात. या काळ्या दंगमुळे एकत्र आपण वयस्कर किंवा आजारी दिसत असतो. त्यामुळे डोळ्यांखाली असणार्या काळ्या डागांचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होत असतो. 

डोळ्याखाली काळे डाग जाण्यासाठी हे करा घरगुती उपाय : 

  • बटाट्याच्या चकत्या व रस - बटाटा किसून त्याचा रस काळ्या डागांभोवती लावावा किंवा बटाट्याच्या चकत्या ठेवाव्यात आणि दहा मिनिटांनी चेहरा गार पाण्याने धुवावा. 
  • हर्बल चहा - हर्बल चहा बनवल्यानंतर त्या टी बॅग्ज किंवा वापरलेला चहा पावडरचा चोथा टाकून न देता ते फ्रीजमध्ये ठेवावेत, त्यानंतर टी बॅग्ज किंवा हर्बल चहा पावडर कापडात बांधून डोळ्यांवर ठेवावी. याचाही खूप चांगला उपयोग होतो आणि काळे डाग कमी होतात.
     
  • थंडगार लेप - एक चमचा टोमॅॅटो रस, लिंबाच्या रसाचे काही थेंब, चिमुटभर हळद आणि थोडसं गव्हाचे पीठ यांची पेस्ट बनवा. ही पेस्ट काळ्या डागांवर लावा व पंधरा मिनिटांनी धुवून टाका. 
  • मसाज - खोबऱ्याचे आणि बदामाचे तेल एकत्र करून त्याने काळ्या डागांवर हलक्या हाताने मसाज करा. एक तास हे तेल चेहऱ्यावर राहू द्यावे. तासाभराने चेहरा कोमट पाण्याने पुसावा आणि नंतर धुवावा.     

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स