रिठाचा उपयोग
रिठाचा उपयोग पुढीलप्रमाणे आहे.
- अंगाचा दाह होत असल्यास रिठाचा फेस अंगाला चोळल्याने आराम वाटतो.
- पोटात कृमि झाल्याने लहान मुलांचे पोट सतत दुखत राहते. अशावेळी पाव ग्रॅम रीठाचे टरफल गुळातून घाटवल्यास कृमि पडून जातात.
- कफ चिकटून राहत असल्यास तोंडात रिठा धरून थोडा थोडासा गिळत राहिल्यास कफ पातळ होतो आणि पडून जातो.
- मनुष्य फेफरे येवून पडल्यास रिठे उकळवलेले पाणी नाकात सोडणे हा उत्तम उपाय आहे.
- कोणत्याही प्रकारचे विष पोटात गेले तर रीठ्याचे पाणी प्यायला द्यावे. यामुळे उलटी होते आणि विष उतरते.
- मसालायुक्त शिकेकाई करताना रिठे वापरले जातात. त्यामुळे नैसर्गिक कंडीशनरचे काम होते.
- रिठे भिजत घालून त्या पाण्यात सोन्याचे अथवा चांदीचे दागिने भिजवून ठेवल्यास चिकटलेला मळ निघून दागिना स्वच्छ व चमकदार होतो.

Comments
Post a Comment