वाटाणे खाण्याचे फायदे
वाटाणे खाण्याचे फायदे:-
- शरीरासाठी चांगला असणारा कोलेस्टेरॉल वाढतो :- वाटण्यामध्ये नियासिन आढळते. ज्यामुळे खराब कोलेस्टेरॉल कमी होऊन शरीरासाठी चांगला असणारा कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते.
- वजन कमी करण्यासाठी फायदेशीर :- वाटण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. यामुळे पोट खूप वेळासाठी भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. यामुळे वाटणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
- संधिवातासाठी फायदेशीर :- वाटण्यांंना सेलेनियम नावाचे पोषकतत्व आढळते. तज्ञांच्या मतानुसार संधीवातापासून सुटका मिळवण्यासाठी हे पोषकतत्व फायदेशीर ठरते. त्यामुळे संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी जेवणात वाटण्यांचा समावेश करावा.
- दृष्टीसाठी फायदेशीर :- वाटण्यामध्ये जेक्सेथिन आणि ल्युटीन ही पोषकतत्व आढळतात. ही पोषकतत्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी, दृष्टीसाठी फायदेशीर मानले जातात.
- त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर :- वाटाणे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. कारण यामध्ये आढळणारे विटामिन सी, विटामिन बी आणि फॉंलेट हे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच वाटण्यामध्ये आढळणारे फ्लेवोनॉइड, कैरोटेनॉइड आणि अल्फा कैरोतीन अँँटी एजिंगचे काम करतात.

Comments
Post a Comment