बेंबी जवळ दुखणे याची कारणे व उपाय
बेंबी जवळ दुखणे :-
बऱ्याचदा बेंबी जवळ दुखू लागते. आपल्या बेंबी जवळ आतडे मुत्रवह संस्थेचे अवयव, प्रजनन अवयव असे अवयव येतात. त्यामुळे विविध कारणांमुळे बेंबी जवळ दुखू शकते. मुत्रमार्गातील इन्फेक्शन, मुतखडा, अॅॅपेंडिक्सला सूज येणे, हर्निया, गॅॅसेस, मासिक पाळी, गर्भावस्था अशा विविध कारणांनी बेंबी मध्ये दुखते.
बेंबी मध्ये दुखणे याची कारणे :-
- मुत्रमार्गात इन्फेक्शन होणे, मुतखडा, अॅॅपेंडिक्सला सूज येणे.
- पचन संबधित गॅॅसेस, बध्दकोष्ठता, अपचन, इरिटेबल बोवेल सिंड्रोम ह्यामुळे देखील बेंबी जवळ दुखते.
- बेंबी सरकल्यामुळे देखील तेथे दुखू लागते.
- हर्नियामुळे बेंबी जवळ दुखू शकते.
- स्त्रियांमध्ये मासिक पाळी, अंडाशयातील वेदना.
- गर्भाशयाच्या फायब्राॅॅइडस, एंडोमेट्रीओसिस, गर्भावस्था अशा अनेक कारणांनी बेंबीमध्ये दुखत असते.
- बेंबीत दुखत असल्यास गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून ते पाणी प्यावे.
- बेंबी दुखत असल्यास तेथे गरम पाण्याच्या पिशवीने शेक घ्यावा.
- बेंबीत दुखत असल्यास अर्धा कप पाण्यात लिंबू रस व काळे मीठ घालून ते मिश्रण प्यावे. हे उपाय बेंबी जवळ दुखत असल्यास उपयोगी पडतात.
- बेंबी सरकली असल्यास उपाशीपोटी मोहरीच्या तेलाचे काही थेंब बेंबीत घालावे. हा उपाय ३ ते ४ दिवस करावा.
- बेंबी सरकली असल्यास बेंबीच्या ठिकाणी एरंडेल तेल लावावे. व बेंबीच्या भोवताली हळुवार मालिश करावी.
- उपाशीपोटी १० ग्रॅॅम बडीशेप व २० ग्रॅॅम गूळ एकत्र बारीक करून खावे. बेंबी सरकणे यावर हे उपाय उपयोगी पडतात.

Comments
Post a Comment