डोळ्यात रसायन उडणे यावर प्रथोमपचार


 


डोळ्यात रसायन उडणे यावर प्रथमोपचार :- 

  • हा प्रकार फारच गंभीर असून जखमी व्यक्ती कायमची आंधळी होण्याची शक्यता असते. म्हणून जो काही उपाय करावयाचा असेल तो तातडीने करावा लागतो. कारण हे रसायन पातळ होऊन त्याची ताकद कमी होणे गरजेचे असते. 
  • अशा व्यक्तीस पाठीवर उताणे झोपवा, अंगठा व पहिल्या बोटाने तिचे डोळे उघडून धरून त्यामध्ये सतत थंड पाणी ओतत रहा. हे पाणी नाकाच्या बाजूने ओता म्हणजे दुसरा डोळा त्यापासून सुरक्षित राहील. 
  • ह्यानंतर डोळ्याची सतत उघडमिट करा म्हणजे पापण्यांचा आत बसलेले रसायन निघू शकेल.
     
  • किमान दहा मिनिटे डोळा धुवा, ह्या वेळेमध्ये कोणतीही काटकसर करू नका. 
  • ह्यानंतर डोळ्यांवर हलक्या हाताने पट्टी बांधा व ती जागेवरून सरकत नाही हे पहा. 
  • जखमीस धीर द्या आणि त्यास दवाखान्यात घेऊन जा.  

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स