गुडघा आणि कोपऱ्यावरील डाग घालवण्यासाठी सोपे उपाय
अनेकजण चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी, चेहऱ्याची त्वचा उजळ होण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग घालवण्यासाठी लॉक वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीमचा मोठया प्रमाणात वापर करतात चेहऱ्याकडे आवर्जून लक्ष देण्याबरोबर आपल्यापैकी अनेकांना याची कल्पना नसते की आपल्या गुडघ्यांंबरोबरच हाताच्या कोपरांंवरही काळे डाग असतात. सहजपणे या गोष्टीकडे आपलं लक्षही जात नाही. मात्र शॉर्ट कपडे म्हणजेच वन पीस किंवा थ्री फोर्थ अथवा स्लीव्हलेस कपडे घातल्यानंतर हे डाग प्रकर्षाने जाणवतात. अनेकदा तर हे डाग कमी करण किंवा घालवता येतील का याचा विचारही आपण करतो.
घरच्या घरी घालवा हे डाग
सामान्यपणे अंघोळ करताना साबण लावून घासल्याने हे डाग कमी होत नाही. मात्र काहीजण वेगवेगळ्या क्रीमच्या मदतीने हे डाग उठून दिसणार नाहीत याची काळजी घेताना दिसतात. मात्र यात फारस यश येत नाही. त्यामुळे अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या तुम्हाला गुडघ्याबरोबरच कोपरांंवरही डाग कमी करण्यासाठी मदत करतील. यासाठी तुम्हाला घरात असलेल्या नारळाच्या तेलाची मदत घेता येईल.
तेल फार फायद्याचे
खरं तर नारळाच तेल हे त्वचेसाठी फायद्याचं असत. नारळाच्या तेलामध्ये व्हिटॅॅमीन ई असते. यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास माॅॅइश्चर म्हणजेच ओलावा टिकून राहतो. त्यामुळेच हे तेल त्वचेची देखभाल करण्यासाठी आणि प्रामुख्याने टी कोरडी पडू नये यासाठी फार फायद्याचे असते. याच तेलामध्ये एक खास गोष्ट मिक्स केल्यास गुडघा आणि हाताच्या कोप्रव्रील डाग कमी करता येतील.
तेलात मिक्स करा ही गोष्ट आणि मिळवा डबल फायदा
- नारळाच्या तेलामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून गुडघ्यावर आणि कोपरावर मालिश केली तर अधिक फायदा होतो.
- गुडघ्यावर आणि कोपरावर दिवसातून किमान २ ते ३ वेळा मालिश करण फायद्याचं ठरतं. अंघोळीनंतर सायंकाळी घरी पोहोचल्यावर आणि रात्री झोपण्याच्या आधीच वेळ यासाठी निश्चित करता येईल.
- अक्रोडच्या सालीची पावडर नारळाच्या तेलात टाकून लावल्यास ती गुडघ्यावर आणि कोपरावरील डाग घालवण्यासाठी फारच फायद्याची ठरते. मात्र हे मिश्रण नियमितपणे लावणे आवश्यक आहे.

Comments
Post a Comment