जायफळ फायदे





जायफळचे फायदे पुढीलप्रमाणे :-
 
  • मुखदुर्गंधी नाशक :- पारंपारिक विडा तयार करताना मुखदुर्गंधी नाशक म्हणून जायफळ चूर्ण पानात घालतात. 
  • डोकेदुखी :- सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर पाण्यात जायफळ उगाळून लावावे. 
  • तहान लागत असेल तर :- सातत्याने तहान लागत असेल तर जायफळाचे चाटण द्यावे. 
  • पचन संस्थेवर उत्तम उपयुक्त :- जायफळ हे पचन संस्थेवर उत्तम उपयुक्त आहे. मुखापासून गुरुद्वारा पर्यंत सर्वत्र पचनाची शक्ती वाढवायची अद्भुत ताकद या औषधात आहे.
     
  • मुरुमांचा त्रास खूप कमी येतो :- चेहऱ्यावर मुरूम असतील तर रात्रीच्या वेळी झोपताना दुधात जायफळ उगाळून चेहऱ्यावर फक्त मुरुमांच्या ठिकाणी लावावे. आणि रात्रभर तसेच ठेवावे. मुरुमांचा त्रास खूप कमी येतो. 
  • दमा :- जुनाट सर्दी, खोकला, दमा, उचकी अशा विकारात जायफळ चूर्ण मधातून चाटावे. 
  • ताप :- ताप आणि जुलाब अशी लक्षणे एकत्र असतील तर जायफळ उपयुक्त आहे. अशा जुलाबानंतर आलेला थकवा जायफळ त्वरित दूर करते. 
  • अनिद्रा :- जास्त मात्रेत जायफळ मादक परिणाम करते. त्यामुळे रात्री झोपताना दुधातून जायफळ घेतले तर अनिद्रा हे लक्षण कमी होते. 
  • सर्दी :- लहान मुलांच्या सर्दी पडश्यावर तेलात जायफळ उगाळून त्याचा लेप कपाळावर लावतात. 
  • त्वचा शिथिल :- त्वचा शिथिल पडायला लागली की जायफळाच्या तेलाने अभ्यंग करावा.  

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स