मार्केटमधून स्क्रब विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी बनवा आयुर्वेदिक 'बॉडी स्क्रब'
संत्र्याच्या साली पासून स्क्रब कसं बनवाल ?
संत्र्यांच्या सालीचे बॉडी स्क्रब बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक भांड घ्या. त्यानंतर दोन संत्र्यांच्या साली मिक्सर जारमध्ये बारीक करून त्याची पावडर टाका. त्यानंतर तुम्ही त्यात २ ते ४ चमचे कच्चे दूध आणि सुमारे २ ते ३ चमचे गुलाबजल त्यात घाला. नंतर या तीन गोष्टी नीट मिक्स करा आणि त्याची एक स्मूद पेस्ट बनवा अशा प्रकारे तुमचे संत्र्याचे बॉडी स्क्रब तयार झाले.
संत्र्याच्या सालीपासून बनवलेलं हे स्क्रब कसं वापरायचं ?
संत्र्याच्या सालीपासून बनवलेलं हे स्क्रब लावण्याआधी चेहरा किंवा अंगावर पाणी घालून धुवून घ्या आणि पुसून घ्या. त्यानंतर मेकअप ब्रशच्या मदतीने हे स्क्रब चेहऱ्यावर लावा. हे स्क्रब असच ५ ते २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. मग कापूस आणि पाण्याच्या मदतीने चेहरा नीट साफ करा. जर तुम्हाला त्याचा लवकरच चांगला परिणाम हवा असेल तर आठवड्यातून दोन वेळा हे स्क्रब वापरा.
.jpg)
Comments
Post a Comment