तुळशीचे आरोग्यदायी फायदे



 
  • रोगप्रतिकारकक्षमता वाढवण्यासाठी 
तुळशीच्या बियांमध्ये फ्लेवोनाईड आणि फेलोनिक असल्याने ते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतात. जर तुम्ही रोज दिवसातून एकदा जरी तुळशीची पाने चघळलीत किंवा त्याचा पानांचा चहा करून प्यायला तर त्यापासून तुमच्या शरीराला अनेक चांगले फायदे होऊ शकतात. कारण आपली व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असेल तर आपण कोणत्याही आजाराचा सामना सहज करू शकतो.
 

  • सर्दी -पडश्यापासून मुक्तता 
सर्दी-पडस हा खूपच साधा आजार आहे पण यामुळे लोक अगदी हैराण होतात. पण तुळशीच्या मदतीने तुम्ही सर्दी-पडश्याला बर करण्यासोबतच त्यापासून कायमची सुटका देखील मिळवू शकता. तुळस तपासाठी देखील उपयुक्त मानली जाते. तापाची तीव्रता अधिक असल्यास अर्धा लिटर पाण्यात वेलची पावडर, साखर आणि दूध याबरोबर तुळशीची पाने उकळून घ्यावी. तीन तासांच्या अंतराने हा काढा रुग्णाला दिल्यास ताप कमी होतो. 
  • मुरुमांना करा बाय-बाय 
तरुण वयातील मुलींपासून मध्यमवयीन स्त्रियांपर्यंत अनेकांना मुरुमांचा त्रास असतो. हा त्रास दूर करण्यासाठी मुलींचे सदैव काही ना काही घरगुती उपचार सुरु असतात. मुरूम किंवा पुरळांंपासून मुक्तता हवी असल्यास तुळशीपासून बनवलेल्या लेपाइतक श्रेष्ठ गुणकारी अस काहीच नाही. हा लेप तयार करण्यासाठी तुळशीची काही पाने संत्र्याची साल घेऊन त्यात गुलाबजल मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
 

  • डोकेदुखी व तणावापासून सुटका 
या धावपळीच्या जगात बरेच लोक मानसिक त्रासातून जास्त असल्यामुळे ते नकळतच तणावयुक्त जीवन जगताना दिसतात. तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे तणावातून येणाऱ्या नकारात्मक विचारांवर मात करणे देखील सोपे होते. तुळशीची पाने डोकेदुखीवरील रामबाण उपाय म्हणून ओळखली जातात. तुळशीची पाने वाटून चंदनाच्या लेपाबरोबर डोक्यावर लावणेही उत्तम 


Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स