नाकातून रक्त येणे घरगुती उपाय
नाकातून रक्त येणे घरगुती उपाय नाकातून रक्त येणे कारण :- नाकातून रक्त हे अनेक कारणांमुळे येऊ शकते. घोळाणा फुटला तर नाकातून रक्त येते, सर्दी झालेली असताना नाक हा अवयव नाजूक असतो पुसल्यास देखील नाकातून रक्त येते. नाक हा अवयव नाजूक असतो तर त्यामुळे देखील नाकातील छोट्या रक्तवाहिन्या फुटल्यास साधारण रक्त येण्याची भीती असते. कधीकधी नाकाला थोडा जरी धक्का लागला तरी नाकातून रक्त वाहते आणि कधी कधी नाकाच्या अगदी आतील भागातील रक्तवाहिनीला थोडी जरी दुखापत झाली तर तिच्यातून रक्त वाहते. अशावेळेस एखाद्या तज्ञाकडे जाऊन इलाज करावा.
बर्फ लावणे - नाकातून रक्त येणे उपाय :-
नाकाला थंडगार पाणी किंवा बर्फ लावल्यावर रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे नाकातील वाहणारे रक्त गोठते आणि नाकातील रक्तस्त्राव थांबवण्यास मदत होते आणि नाका व्दारे रक्त जाण्याचा त्रास हा कमी होतो.
डोक्यावर पाणी मारणे :-
घोळाणा जर फुटला असेल तर देखील नाकातून रक्त येते आणि जर असे घोळाणा फुटल्यामुळे नाकातून रक्त येत असेल तर, डोक्यावर (टाळूवर) सपसप थंड पाणी मारावे याने नाकातून जाणारे रक्त थांबण्यास मदत होते. थंड पाणी मारल्याने रक्त प्रवाह थोड्या प्रमाणात गोठण्यासाठी बरीच मदत होते आणि जे रक्त नाकावाटे जात असते, ते जाणे थांबते.
कांदा हा थंड असतो आणि कांद्यामध्ये असे गुणधर्म असतात जे की नाकातील रक्तस्त्राव थांबण्यास मदत करतात आणि कांदा हा एक प्रभावी उपाय आहे ज्याने रक्त थांबण्यास मदत होते. कांद्याचा रस काढून घ्यावा आणि त्यामध्ये सुती लोकर बुडवावी आणी ही सुती लोकर नाकपुडीवर तीन ते पाच मिनिटे ठेवा याने नाकातील रक्त वाहण्याचे प्रमाण कमी होते.
खारट मीठ आणि बेकिंग सोडा चे पाणी :-
खारट पाण्याने सुध्दा नाकातील रक्त वाहने बंद होण्यास मदत होते आणि खारट पाणी तयार करण्यासाठी अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यावा, अर्धा चमचा मीठ घ्यावे आणि सिरींजच्या मदतीने हे मिश्रण नाकामधील एका नाकपुडीत टाकावी आणि दुसरी नाकपुडी बोटांच्या सहाय्याने दाबून बंद करावी आणि असे केल्यानंतर डोके खाली करून पाणी बाहेर काढून टाकावे आणि तीन ते चार वेळा करावे, याने रक्त वाहने बंद होण्यास मदत होईल.
गरम पाण्याची वाफ :-
आपण सर्दी झाल्यावर जशी वाफ घेतो अगदी तशीच वाफ नाकातून रक्त वाहताना घेण्याचा प्रयत्न करावा परंतु नाकातून रक्त येत असेल तर या पाण्यामध्ये विक्स, झेंडूबाम हे काही टाकू नये, फक्त गरम पाणी घ्यावे याने काय होते की वाफ घेतल्यावर नाकातील आतील भागावर ओलावा निर्माण होतो आणी कोरडेपणा दूर होतो यामुळे नाकातील रक्तस्त्राव थांबण्यास मदत होते.
व्हिनेगर :-
एक चमचा अॅॅपल सायडर व्हिनेगर किंवा पांढरे व्हिनेगर घ्यावे आणि त्यामध्ये एका छोटासा कापसाचा बोला किंवा सुती कापडाचा बोळा बुडवावा आणि रक्तस्त्राव होत असलेल्या नाकाच्या नाकपुडीवर दहा मिनिटे ठेवावे याने नाकातील रक्तस्त्राव बंद होण्यास मदत होते.
बेलाच्या पानांचा काढा :-
नाकातून रक्त येत असल्यास बेलाची चार पाच पाने घ्यावीत आणी ती एका पातेल्यात टाकून खळबळ उकळून घ्यावीत आणि ज्यांच्या नाकातून रक्त येत आहे अशा व्यक्तीस हा बेलाच्या पानांचा काढा पिण्यास द्यावा. बेलाची पाने झाडांची सहसा कुठेही भेटतात हा काढा सतत दोन ते तीन वेळेस प्यावा याने अधून-मधून नाकातील रक्त येणे बंद होईल आणि आपली या त्रासापासून मुक्ताला होईल.

Comments
Post a Comment