यकृत निरोगी आणि तंदुरुस्त कसं ठेवायचं ?
उन्हाळ्यात आपल्याला भरपूर पाणी पीने गरजेचे असते. त्यातून आपल्याला जर आपल शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर आपल्याला रोज लघवी साफ होणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्हाला यकृत स्वच्छ आणि तंदुरुस्त ठेवणे ही महत्त्वाचे असते. मुळात आपल्याला आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे असते. बाहेरचे अरबट सरबट खाऊन ज्याप्रमाणे आपल्या पोटाला त्रास होतो त्याप्रमाणे आपल्या शरीरातील इतर अवयवांवरही होतो.
आपल्या शरीरात आपल्या कळत नकळत अनेक विषारी पदार्थ तयार होतात तेव्हा अशा वेळी आपल्याला योग्य टी काळजी घेणेही आवश्यक असते. आपल्याला त्यासाठी आपल शरीर डीटॉक्स करणे अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु तुम्ही योग्य आणि आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करत तुमचं यकृतही सुदृढ ठेवू शकता.आपल्याला आपल यकृत स्वच्छ आणि निरोगी ठेवणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही अनेक घटक रोगांपासून स्वतःचे रक्षण करू शकता.
तुम्ही तुमचं लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी घरगुती उपायही वापरू शकता.
- आपल्या आहारात हिर्व्हा भाज्यांचा समावेश करा. पालेभाज्या खाण्यावर तुम्ही भर देऊ शकता. यात पालकाचाही समावेश करू शकता.
- फळांचे सेवन करा. ज्यात तुम्हाला व्हिटॅॅमिन सी मिळेल अशा फळांचा समावेश करा.
- हळद - तुमच्या आहारात तुम्ही हळदीचा वापर वाढवू शकता. हळद ही गुणकारी असते. मुळात हळद ही जंतुनाशक असते. तेव्हा लिव्हर डिटॉक्सिफिकेशन साठी हळद हा चांगला पर्याय ठरू शकतो.
- फाईटोन्यूटीएंटस ज्यातून मिळतील अशा फळांचे सेवन करा. उदा. लिंबू, संत्र इत्यादी.
- तुम्ही मासे आणि अंडी खाऊ शकता.
यकृत साफ ठेवण्यासाठी तुम्ही भरपूर पाणी घ्या. तुम्ही जास्त कोल्ड्रिंक पीने शक्यतो टाळा. त्यातून तुम्हाला जर पोटदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होत असेल तर वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या. पहिली गोष्ट म्हणजे यकृत खराब झाले असेल तर वेळीच लक्षणे ओळखा आणि आपला डाएट प्लान बदला. कारण आपल्या खाण्यात अरबट सरबट आले तर त्याचा त्रास तुम्हालाही होऊ शकतो. तेव्हा यकृत स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे टेस्ट केल्यानंतर तुम्हाला यकृताचा काही त्रास आहे का हे कळू शकते. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा त्रास सहन करावा लागू शकतो.
.jpg)
Comments
Post a Comment