पेरू खाण्याचे फायदे
पेरू खाण्याचे फायदे :-
- तोंडाची चव गेली असल्यास :- तोंडाची चव गेली असल्यास, उलटी किंवा मळमळ झाल्यासारखे वाटत असल्यास पेरूचे सरबत अधिक फायदेशीर ठरते.
- 'क' जीवनसत्व :- दुपारी जेवणानंतर पेरू खाणे अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये असणाऱ्या 'क' जीवनसत्वामुळे तसेच ग्लुकोज या घटकांमुळे जेवण सहजरीत्या पचते.
- नशा कमी करण्यासाठी :- एखाद्या व्यक्तीला दारू किंवा भांग जास्त झाल्यामुळे खूप नशा झाली असेल तर पेरूच्या पानांचा रस प्यायला दिल्यास नशा कमी होऊ शकते.
- तोंड आले असेल तर :- जर तुमचे तोंड आले असेल किंवा वारंंवार तुम्हाला माउथ अल्सरची समस्या असेल तर पेरूची कोवळी ताजी पाने चावून-चावून खाल्ल्यास आराम मिळेल.
- डायबेटीज :- पेरू खाल्याने रक्तातील साखरेचा स्तर कमी होतो, कारण यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. हे साखरेला डायजेस्ट करणे आणि इन्सुलिन वाढवण्यास मदत करते.
- त्वचा उजळण्यासाठी :- पेरूमध्ये पोटॅॅशियम तत्व असल्यामुळे याच्या सेवनाने त्वचा उजळते तसेच त्वचेवरील पुरळ, फोडंं, काळे डाग दूर होतात.
- वजन कमी करण्यासाठी :- लट्ठपणा वाढण्याचे मुख्य कारण कोलेस्टेरॉल असते. पेरूमधील उपस्थित तत्व कोलेस्टेरॉल कमी करतात. यामुळे वजन वाढत नाही.
- बद्धकोष्ठता झाल्यास :- पेरू शरीरातील मेटाबॉलिझम समतोल ठेवण्यास मदत करते. यामुळे पेरूचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

Comments
Post a Comment