दही खाण्यामुळे होणारे फायदे
दही :- दही ह एक दुग्धजन्य पदार्थ असून दही खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. दह्यात कॅॅॅॅॅॅल्शियम, व्हिटामिन-B12, राइबोफ्लेविन, व्हिटामिन-D, मॅग्नेशियम, पोटॅॅॅॅशियम, फॉंस्फरस यासारखी अनेक उपयुक्त पोषकतत्वे व मिनरल्स असतात. दह्याचे आरोग्यदायी फायदे व तोटे याविषयी माहिती खाली दिली आहे.
दही खाण्याचे फायदे :-
- हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त :- दह्यात कॅॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटामिन-D चे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे दही खाणे हे आपल्या हाडांच्या व दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय दही खाण्यामुळे हाडे ठिसूळ होऊन ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोकाही कमी होतो.
- पचनक्रियेमध्ये उपयुक्त :- दह्यात प्रोबायोटिक्स हे घटक असतात. त्यामुळे दही खाण्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते. दही खाण्यामुळे पोटफुगी, अतिसार, बद्दकोष्ठता यासारख्या पचनासंबंधी समस्या दूर होतात.
- इम्युनिटी वाढवते :- दह्यात प्रोबायोटिक्स या घटकाबरोबरच विविध व्हिटामिन आणि मिनरल्ससुद्धा भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे दही खाण्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती अर्थात इम्युनिटी वाढण्यास मदत होते.
- वजन आटोक्यात राहते :- दह्यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाणसुद्धा भरपूर असते. साधारण २०० ग्राम ध्यातून १२ ग्राम प्रोटिन्स मिळते. यातील प्रोटिन्समुळे दही खाल्याने, पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे भूक नियंत्रित होते व पर्यायाने वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
- गरोदर महिलांसाठी फायदेशीर :- गर्भवती महिलांच्या आहारात दह्याचा जरूर समावेश करू शकता. प्रेग्नंसीमध्ये रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन नियंत्रित होण्यासाठी दही प्रभावी ठरते.

Comments
Post a Comment