शिकेकाईचा उपयोग
शिकेकाईचा उपयोग पुढीलप्रमाणे :
- शिकेकाईची पूड पाण्यात उकळून स्नानाकरिता वापरतात.
- केसातील दारुणा व उवा यांचा त्यामुळे नाश होतो आणि केसांची वाढ चांगली होते.
- त्वचा कोरडी पडत नाही.
- शमी व गरम कपडे आणि डाग पडलेली चांदीची भांडी व उपकरणे धुण्यास ती पूड चांगली असते.
- खोडाची साल ही मासे पकडण्याची जाली व दोर रंगविण्यास आणि त्यांचा टिकाऊपणा वाढविण्यास वापरतात.
- हळद व शिकाकाईची पाने यांपासून हिरवा रंग मिळतो.
- शिकेकाईची पूड घालून केलेले मलम त्वचारोगांवर लावतात.
- गुरांना विषबाधा झाल्यास शिकेकाई बियांसह ताकात वाटून पाजावी.
- बाजारात शिकेकाईची सुगंधी पूड मिळते.

Comments
Post a Comment