सायकलिंग व्यायाम व सायकल चालवण्याचे फायदे


 

सायकलिंग व्यायाम :
 

सायकलिंग हा एक एरोबिक व्यायाम प्रकार असून सायकल चालवण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. नियमितपणे सायकलिंगच्या व्यायामामुळे हृदय, फुफ्फुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्याचे आरोग्य चांगले राहते, शरीरात रक्त संचारण व्यवस्थित होते, शरीरातील अतिरिक्त चरबी, कॅलरीज बर्न होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. 

सायकल चालवण्याचे फायदे : 

  • स्नायू बळकट होतात :- सायकलिंगमुळे शरीराच्या मांसपेशी, सांधे आणि हाडांची हालचाल होते. त्यामुळे स्नायू बळकट होतात. त्याचबरोबर हाडे व सांधे मजबूत होण्यासही यामुळे मदत मिळते. शरीराच्या फिटनेससाठी सायकलिंगच्या व्यायामाचा फायदा होतो. 
  • वजन नियंत्रित राहते :- सायकल चालवण्याचा व्यायाम हा वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण सायकलिंगमध्ये आपल्या शरीराच्या अनेक स्नायूंंचा व्यायाम होतो. फक्त अर्धा ते एक तास सायकलिंगमुळे तुम्हाला संपूर्ण वर्कआउटचा फायदा मिळतो. एक तासाच्या सायकलच्या व्यायामातून ५०० ते ८०० कॅलरीज बर्न करता येतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास सायकल चालवण्याने मदत होते.
     
  • मधुमेह आणि कॅन्सरला दूर ठेवतो :- वाढलेले वजन, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव यामुळे होणाऱ्या टाईप २ मधुमेहाचा धोका दररोज सायकलच्या व्यायामाने कमी होतो. याशिवाय नियमित सायकलिंगमुळे आतड्याचा कॅन्सर, स्तनाचा कर्करोग टाळता येवू शकतो. 
  • मानसिक स्वास्थ्य सुधारते :- सायकलिंगमुळे मानसिक तणावापासून आराम मिळतो व मेंदू आणखी सक्षमरीत्या काम करतो. मन उदास होणे, ताणतणाव, चिडचिडेपणा येणे हे सर्व सायकलिंगने कमी होते. सायकल चालवल्यामुळे शरीराची एक्सरसाईज होते त्यामुळे झोप निवांत लागून सकाळी ताजेतवाने वाटते. 
  • दुखापत होण्याचा धोका कमी असतो :- वजन उचलणे, जाॅगिंग अशा अनेक वर्कआउटमध्ये दुखापत किंवा इंज्युरी होण्याची शक्यता असते. मात्र सायकलिंगमुळे दुखापत होण्याचा धोका फारसा नसतो. सायकल चालवताना सांध्यावर ताण कमी पडतो त्यामुळे दुखापत कमी होते. 
    

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स