पारिजातकाचे आरोग्यदायी फायदे
चहाच्या व्यतिरिक्त पारिजातकाच्या झाडाचे अनेक औषधी फायदे आहे जाणून घेऊ या कोणत्या आजारात हे वापरावे.
- सांधे दुखी :- पारिजातकाचे ६ ते ७ पाने तोडून बारीक वाटून घ्या. वाटून या पेस्टला पाण्यात घालून मात्रा कमी होण्यापर्यंत उकळवून घ्या आणि थंड करून दररोज सकाळी अनोश्यापोटी प्यावं. नियमाने असे केल्यास सांध्यांशी निगडीत इतर समस्या नाहीश्या होतात.
- खोकला :- खोकला आणि कोरड्या खोकल्यासाठी पारिजातकांच्या पानांना पाण्यात उकळवून प्यायल्याने खोकला नाहीसा होतो. आपली इच्छा असल्यास याला साधारण चहामध्ये उकळवून किंवा बारीक वाटून मधासोबत देखील घेऊ शकता.
- ताप :- कोणत्याही प्रकारचा ताप असल्यास पारिजातकाच्या पानांचा चहा पिणे खूप फायदेशीर असते.
- सायटिका:- दोन कप पाण्यात पारिजातकाचे सुमारे ८ ते १० पाने मंद आचेवर अर्ध होईपर्यंत उकळावे. थंड करून सकाळ संध्याकाळ अनोश्या पोटी प्यावं.
- मुळव्याध :- पारिजातकाची पान मुळव्याधसाठी एक चांगले औषध मानले जाते. यासाठी पारिजातकाच्या बियाणं घेणे किंवा त्याची पेस्ट बनवून त्या जागीस लावल्याने फायदेशीर असतं.
- वेदना :- हात, पाय आणि स्नायू ताणतात आणि दुखतात. त्यावेळी पारिजातकाच्या पानांचा रसाला समप्रमाणात आल्याच्या रसात मिसळून प्यायल्याने फायदे होतात.

Comments
Post a Comment