पोट दुखणे यावर घरगुती उपाय
पोट दुखणे यावर घरगुती उपाय :-
- आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे. असे केल्याने पोट दुखणे थांबते.
- आल्याचा रस नाभीवर लावल्याने आणि ह्कली मालिश केल्याने पोटदुखी कमी होण्यास मदत होते.
- अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद एकत्र करून थंड पाण्यासोबत घ्यावी. असे केल्याने पोट दुखणे थांबण्यास मदत होते.
- अर्धा चमचा आल्याचा रस व अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये थोडेसे मीठ टाकून प्यायल्याने पोटदुखी थांबते.
- एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा एकत्र करून प्यायल्याने पोट दुखी लगेच थांबते.
- चांगल्याप्रकारे शिजलेले तांदूळ एका कॉटनच्या कपड्यात बांधून शेकल्यास पोट दुखी थांबते.
- एक ग्लास पाण्यामध्ये थोडासा गोड सोडा टाकून प्यायल्याने पोट दुखणे थांबते.

Comments
Post a Comment