लांबच्या प्रवासात गाडीचा त्रास होत असेल तर घरगुती उपाय


        सर्व उपाय करूनही गाडी अथवा बस लागली तर अनेकजण अशा वेळी पॅॅनिक होतात परंतु तुम्हाला अशा वेळी पॅॅनिक होण्याची गरज नाही. तुम्ही हा त्रास अगदी घरगुती उपाय वापरूनही निपटवू शकता. जाणून घेऊया की तुम्ही अशा वेळी कोणते सोप्पे घरगुती उपाय करू शकता.

        
       मुळात प्रवास करताना आपण काय खातो याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकदा आपल्या खाण्यापिण्यात नको त्या गोष्टी जातात आणि त्यामुळे आपल्याला प्रवासात उलटी येते. त्यानंतर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. आणि त्यातून पुन्हा उलटीचा त्रासही वाढू शकतो. अशा वेळी पोटात हलक जेवण जे पचायला योग्य असेल असे जेवण खाण महत्त्वाचे असते. 

         जंक पूड किंवा पोटाला जड असणारे पदार्थ तुम्ही खाल्लेत तर प्रवास करताना पोटात अन्न ढवळलं जाऊन त्याचा त्रासही होऊ शकतो. काहींना उलटीचा त्रास असेल तर काहींना प्रवासात शौचालयालाही सारखी सारखी लागू शकते. 

गाडीचा त्रास होत असल्यास घरगुती उपाय : 

  • लिंबू  : 
           तुम्ही प्रवासात जाताना लिंबू सोबत ठेवा. तुम्हाला असे वाटत असेल की उलटीचा त्रास होतो आहे. तर मग लिंबूच्या फोडीचा वास घ्या. या वासाने तुम्हाला उलटीचा त्रास होणार नाही.
 
  • आलं : 
           आल्याचे तुकडे ही तुम्ही प्रवासात सोबत ठेवू शकता. लिंबूप्रमाणे त्याचेही काप करा. आणि ते तुम्हाला असं वाटल की उलटीचा त्रास होऊ शकतो तर आल्याचे तुकडे चाखू शकता. 
  • लवंग : 
           लवंगासोबतच तुम्हाला काळे मीठ, साखर पावडर टाकून त्यांच्या मिश्रणाचे सेवन करू शकता. 
  • अजवाइन : 
           अजवाइन, पुदिना, कपूर असे मिश्रण घेऊन ते उन्हात ठेवा आणि त्यानंतर त्याचे मिश्रण एका बाटलीत घ्या आणि त्याचा ज्युस करा. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स