द्राक्ष खाण्याचे फायदे...
चवीला अतिशय रुचकर लागणारे, लहान आणि मोठेही हौसेने खातात ते फळ म्हणजे द्राक्ष ! द्राक्ष खाल्याने अनेक आजारांना आपण पळवून लावू शकतो. तसेच अनेक प्रकारांचे आजार होण्यापासुनही द्राक्षातील घटक आपल्याला मदत करतात.
- द्राक्षांमध्ये प्रोटिन्स, पोटॅॅशियम, कार्बोहायड्रेट तसेच ग्लुकोजचे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असणाऱ्यांना द्राक्ष खाणे अतिशय महत्वाचे आहे.
- थकवा जाणवत असेल तर द्राक्ष खाण्याने थकवाही पळून जाऊन ताजेतवाने वाटते.
- आपल्या शरीरातील काही अनावश्यक द्रव्य शरीरातून बाहेर काढण्यासाठी द्राक्षातील साखर खूपच उपयुक्त ठरते.
- रक्तातील क्षारांचे संतुलन राखण्यासाठीही द्राक्ष खाणे अतिशय उत्तम आहे.
- शरीरातील आम्ल वाढल्यासही द्राक्ष खाल्याने ते कमी होते.
- मानसिक तणावाखाली असलेल्यांनी तर द्राक्षांचे सेवन करावेच यामुळे त्यांना तणावातून मुक्तता मिळू शकते.

Comments
Post a Comment