पोटाची गाठ सरकणे याची कारणे व उपाय
पोटाची गाठ सरकणे :-
काहीवेळा नाभी आपल्या जागेवरून थोडी सरकते. नाभी सरकल्यामुळे पोटात जोरात दुखू लागते. ग्रामीणभागात काहीजण या त्रासाला "पोटाची गाठ सरकणे" असे म्हणतात. पोटातील गतः सरकणे याची कारणे, लक्षणे व उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.
पोटातील गाठ सरकणे याची कारणे :-
या त्रासात जड वस्तू उचलणे, अचानक खाली वाकणे, खेलकुद अशा कारणांनी आपली नाभी थोडीशी बाजूला सरकते. नाभी सरकल्याने पोटात जोरात दुहू लागते आणि जोवर सरकलेली बेंबी आपल्या मूळ ठिकाणी येत नाही तोवर पोट दुखत असते. तसेच पुढे वाकताना, वस्तू उचलताना यावेळी त्रास होऊ लागतो.
पोटाची गाठ सरकणे यातील लक्षणे :-
- पोटात जोरात वेदना होणे.
- पोटावर सूज जाणवणे.
- जुलाब अतिसार होणे.
- उलटी किंवा मळमळ होणे.
- महिलांमध्ये मासिक पाळीत अधिक रक्त जाणे,
- पाळीच्या वेळी अधिक पोट दुखणे.
पोटाची गाठ सरकणे यावर उपाय :-
- पोटाची गाठ सरकल्यास नाभीच्या भोवताली हळूवार मालिश करावी.
- पोटाची गाठ सरकल्यास उपाशीपोटी मोहरीच्या तेलाचे काही थेंब नाभीत घालावे. हा उपाय ३ ते ४ दिवस करावा.
- नाभीच्या ठिकाणी एरंडेल तेल लावल्यानेही पोटाची गाठ तिच्या जागी येण्यास मदत होते.
- पोटाची गतः सरकल्यास दहा ग्रॅॅम बडीशेप व २० ग्रॅॅम गूळ एकत्र बारीक करावे. हे मिश्रण काही दिवस सकाळी उठल्यावर उपाशीपोटी खावे.
पाठीचा झोपून पोटावर छोटा दिवा ठेऊन त्यावर तांब्या झाकावा. यामुळे दिवा आपोआप विजतो व तांब्याच्या आंत Vacuum तयार होतो. त्यानंतर नाभी योग्य ठिकाणी येण्यासाठी त्या बाजूला हळूवार तांब्या नेला जातो. या उपायाने पोटाची गाठ आपल्या जागी येण्यास मदत होते. हा उपाय अनुभवी व्यक्तीने करणे आवश्यक आहे.
पोटात गाठ सरकणे यामध्ये घ्यायची काळजी :-
- काही दिवस जड वस्तू उचलणे टाळावे.
- पोटातील गाठ सरकणे यावर आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.
- ह्लास्न्म नौकासन आणि पवनमुक्तासन यासारखी योगासने पोटातील गाठ सरकणे यावर फायदेशीर आहेत. ती योगासने नियमित करावीत.
- घरगुती उपाय करूनही पोटात होणाऱ्या वेदना कमी होत नसल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
.jpg)
Comments
Post a Comment