लघवी करताना जळजळ, वेदना ; घरगुती उपचारांनी मिळवा आराम
काही विशिष्ट पदार्थांचं विशिष्ट पद्धतीने सेवन केल्याने लघवीशी संबंधित या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.
लघवी करताना जळजळ आणि वेदना होण्याच्या समस्येस डिस्युरिया असं म्हणतात.
लिंबू :-
लिंबामध्ये अॅॅसिड असत जे जीवाणू आणि विषाणूपासून बचाव करत. लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात टाका. त्यात मध मिसळा आणि दररोज रिकाम्या पोटी प्या.
काकडी :-
डिसयुरियामध्ये काकडी एक प्रभावी औषध मानलं जातं. जेव्हा शरीर हायड्रेटेड राहतं तेव्हा शरीरातील सर्व विषारी द्रव्य लघवीवाटे शरीराबाहेर जातात, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा धोका राहत नाही. काकडी शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचे कार्य करते कारण त्यात ९५% पाणी असत. काकडीचा रस बनवून त्यात एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोनदा प्यायल्याने डिसयुरिया बरा होतो.
मेथीचे दाणे डीस्युरियामध्ये प्रभावी औषध म्हणून काम करतात. मेथीचे दाणे योनीमार्गाची सामान्य पीएच पातळी राखत, संक्रमणापासून संरक्षण करत, तसच शरीरातील विषारी द्रव बाहेर टाकण्याचं कार्य करत. एक ग्लास ताकात अर्धा चमचा मेथी दाण्यांची पावडर मिसळून दररोज दोनदा सेवन करा.
दही :-
दह्यामध्ये असे जीवाणू आहेत जे शरीरातले हानिकारक जीवाणू काढून टाकण्यासाठी कार्य करत. दही खाल्ल्यानं लघवीमधील पीएच पातळी सामान्य राहण्यास मदत होते. दररोज तीन कप दही खाल्ल्यास लघवीच्या संसार्गामध्ये बराच फायदा होतो.
अॅॅपल सिडेर व्हिनेगर :-
या व्हिनेगरमध्ये अँँटी-फंगल आणि जीवाणू विरोधक गुणधर्म आहेत, जे बऱ्याच संक्रमणास प्रतिबंधित करतात. त्यात पोटॅॅशियम आणि बरीच खनिजं असतात, जे शरीराची सामान्य पीएच पातळी राखण्यासाठी कार्य करतात. एक ग्लास पाणी गरम करा त्यात एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा मध मिसळा. हे पाणी दिवसातून दोनदा प्या. या मुळे डीस्युरियाची समस्या दूर होईल.
भरपूर पाणी प्या :-
Myupchar.com शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी सर्वात जास्त पाण्याची गरज असते. वास्तविक पाणी प्रत्येक समस्येवर उपचार करत. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं. लघवी करताना जळजळ आणि वेदना होणे या समस्येपासून मुक्त होण्यासाठी भरपूर पाणी प्यावं.
.jpg)
Comments
Post a Comment