प्रोटीन पाउडरचे फायदे तोटे
सध्याची तरुणपिढी ही बॉडीबिल्डींगसाठी प्रोटीन पावडरला जास्त पसंती देतात. नियमित व्यायामासोबतच व्यायाम प्रशिक्षक प्रोटीन पाउडर किंवा प्रथिनेयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. अनेक कंपन्यांचे प्रथिनयुक्त पाउडर बाजारात उपलब्ध आहेत, पण अनेकदा ते आरोग्याला फायदेशीर होण्याऐवजी शरीराला घातक ठरू शकतात. कारण या प्रोटीन पाउडरमध्ये भेसळ केली जाते त्याने फायदा होत नाही तर खूप महागात पडते.
आपल्या आहारात प्रथिनांंना महत्त्वाचे स्थान आहे यात काही शंका नाही. प्रथिनेसाठी अंडी, दूध, दही, मासे, डाळी, मांस, सोयाबीन, फळे , बिया यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. पण या प्रथिनेचा उपयोग आरोग्यावर आणि तुम्ही नियमित करत असलेल्या व्यायामावर अवलंबून असतात.
प्रथिनांमुळे स्नायू वाढतात, हाडे मजबूत होतात आणि प्रतिकारशक्ती सुधारते म्हणून थोडे जास्त प्रोटीन घेतल्यास फायदा होईल का ? प्रथिनांमुळे स्नायूंची वाढ होते हे खरे आहे का ? की अतिरिक्त प्रथिने घेण्याचा धोका असतो का ? जर तुम्ही प्रोटीन घेत असाल तर तुम्ही बजन उचलण्यासारखा रेझिस्टन्स एक्सरसाईजही करत असला पाहिजे. अन्यथा स्नायूंना असा व्यायाम नसेल तर ती अतिरिक्त प्रथिने काहीही उपयोगाची नाहीत.
प्रोटीन पाउडरचे फायदे आणि तोटे
प्रथिने पावडर आणि घन प्रोटीनमधील आणखी एक मुख्य फरक म्हणजे चरबीचे प्रमाण वाढते. बहुतेक प्रथिने पावडर आणि सल्पिमेंटसमध्ये चरबी कमी किंवा असते. यासह आपण मांस आणि मासे खाल्ल्याने होणारे परिणाम गमावतात. चंगले चरबी शरीरासाठी प्रथिनेइतकेच महत्त्वाचे आहेत. पावडरमध्ये प्रथिनांंचे प्रमाण जितके जास्त असेल तितके कमी पोषक तत्वे कमी होतात. जे नैसर्गिकरीत्या मांस, दुग्धजन्य पदार्थ किंवा संपूर्ण धान्यांंमध्ये आढळणाऱ्या प्रथिनांमध्ये आढळतात. म्हणून प्रथिने पावडरचे सेवन केल्याने आपल्याला शरीराला आवश्यक असलेली अनेक आवश्यक खनिजे मिळत नाही. तसेच प्रथिने पावडरची चव सामान्यतः कृत्रिम स्वीटनर्सपासून प्राप्त होते. म्हणूनच ते तुमच्यासाठी फायदेशीर नाही. प्रोटीन शेकची एक समस्या अशी आहे की ते पिण्याने तुम्हाला अन्न खाल्ल्यासारखे समाधान मिळत नाही.
.jpg)
Comments
Post a Comment