डांग्या खोकला आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार
डांग्या खोकला :- डांग्या खोकला हा श्वसन संस्थेचा एक गंभीर असा संसर्गजन्य आजार आहे. डांग्या खोकला या आजाराला Whooping Cough किंवा पेरट्युसिस असेही म्हणतात. डांग्या खोकला हा बोर्डेटेला पट्र्युसिस नावाच्या जीवनामुळे (बँँक्टेरियामुळे) होतो. या बँँक्टेरियाचा संसर्ग झाल्यामुळे तीव्र आणि अनियंत्रित खोकला येतो त्यामुळे रुग्णाला श्वास घेताना अधिक त्रास होऊ लागतो.
डांग्या खोकला हा आजरा कोणत्याही वयाच्या लोकांना त्रासदायक असाच असतो. परंतु त्यातही नवजात बालक आणि लहान मुलांसाठी डांग्या खोकला आजार अत्यंत घातक ठरू शकतो.
डांग्या खोकल्याची लक्षणे :-
डांग्या खोकल्यात सुरुवातीला सर्दी होणे, नाक वाहने, घसा खवखवणे, खोकला येणे आणि ताप येणे अशी लक्षणे असतात. दोन आठवड्यानंतर कोरडा व सतत खोकला येत असतो. ज्यामुळे श्वास घेणे खूप अवघड होते. खोकल्यातून घट्ट बेडके येत असतात. उलटी होऊ शकते. सततच्या खोकल्यामुळे श्वास घेताना "हूप" असा विशिष्ट आवाज येत असतो. म्हणून या आजाराला बोलीभाषेत माकड खोकला या नावानेही ओळखले जाते. डांग्या खोकल्यात बरेच दिवस खोकल्याची उबळ येत असते.
डांग्या खोकला होण्याची कारणे :-
डांग्या खोकला हा एक संसर्गिक आजार असून तो या बॅॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. डांग्या खोकला हा अत्यंत संसर्गजन्य असा आजार असून बाधित व्यक्तीच्या खोकला व शिंकेव्दारे याचे जीवाणू हवेत सहजपणे पसरू शकतात आणि त्यामुळे इतर व्यक्तीनीही याची लागण होऊ शकते.
डांग्या खोकल्याचे लक्षणांवरून निदान होण्यास मदत होते. याशिवाय छातीचा एक्स-रे, खोकल्यातील बेडक्याची किंवा घशातील स्त्रावांची तपासणी आणि रक्त तपासणी करून याचे निदान केले जाते.
डांग्या खोकल्यावर असे करतात उपचार :-
डांग्या खोकला हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा सांसर्गिक रोग आहे. त्यामुळे डांग्या खोकल्याची लक्षणे जाणवल्यास कृपया आपल्या डॉक्टरांकडून दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावेत. कोणतेही घरगुती उपाय करीत वेळ वाया घालू नये. डांग्या खोकला असल्यास उपचारासाठी डॉक्टर अँँटिबायोटिक्स औषधे देतील. शिवाय खोकला, ताप ही लक्षणे कमी करण्यासाठीही औषधे देतील.
.jpg)
Comments
Post a Comment