कफ किंवा खोकला यावरील उपचार
कफ किंवा खोकला यावरील उपचार पुढीलप्रमाणे आहेत.
- मध आणि मोसंब्याचा रस समप्रमाणात मिसळावा.
- एक चहाचा चमचा मधात थोडी ब्रॅॅॅॅन्डी मिसळावी किंवा लसणीच्या रसाचे काही थेंब मिसळावेत.
- एक चमचा मधात एक कप द्राक्षाचा रस मिसळावा हे मिश्रण नेहमी उपयोगी पडते.
- एक चमचा कांद्याच्या रसात एक चमचा मध मिसळून हे मिश्रण ३ ते ४ तास तसेच ठेवून नंतर द्यावे. हे उत्तम कफ सिरप आहे.
- बदाम रात्रभर भिजत घालून त्याची साल काढावी. या बदामाची पेस्ट थोडे लोणी आणि साखर यांच्याबरोबर घेतल्यास कोरड्या कफात उपयुक्त ठरते.
- साखर खाल्याने मोठ्या मुलांमध्ये कफ कमी होऊ शकतो.

Comments
Post a Comment