पाठीत मुंग्या येणे याची कारणे व उपाय





 
पाठीत मुंग्या येण्याची कारणे :- 

  • नसांवर दबाव पडल्याने किंवा नस दुखावल्या गेल्याने पाठीत मुंग्या येतात. याशिवाय खालील कारणांनी देखील पाठीत मुंग्या येत असतात. 
  • पाठीच्या कण्यासंबंधी त्रासामुळे जसे हर्नियेटेड डिस्क, स्पाइनल स्टेनोसिस, फायब्रोमायल्जिया, सर्व्हायकल स्पाॅॅन्डिलायटीस, ब्रॅॅचियल प्लेक्सोपॅॅथी यांमुळे पाठीत मुंग्या येऊ शकतात. 
  • वृद्धावस्थेमुळे पाठीत मुंग्या येऊ शकतात. 
  • डायबेटीस, हायपरथायरॉईझम, आमवात मल्टिपल स्क्लेरोसिस, नागीण अशा आजारात पाठीला मुंग्या येऊ शकतात. 
  • शरीरातील व्हिटॅॅमिन-B12 च्या कमतरतेमुळे पाठीला मुंग्या येतात. 
  • प्रेग्नसीन्सीमध्येही काही स्त्रियांना पाठीला मुंग्या येण्याचा त्रास होऊ शकतो. 
  • सिगारेट, तंबाखू, दारूचे व्यसन यांमुळेही हा त्रास होऊ शकतो. 
पाठीत मुंग्या येणे यावरील उपचार :- कारणांनुसार यावरील उपचार ठरतात. जर वारंवर पाठीत मुंग्या येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. पाठीत मुंग्या येण्याचा त्रास अधिक प्रमाणात होत असल्यास न्युरोलॉजिस्ट डॉक्टरांकडून होणाऱ्या त्रासाचे निदान करून त्यांच्याकडून उपचार घ्या. 

       जर किरकोळ कारणांमुळे पाठीत मुंग्या येत असल्यासडॉक्टर या त्रासावर Neuropathic Painkillers गोळ्या औषधे व व्हिटॅॅमिन B12 सारखी सप्लिमेंटस देऊ शकतात. याशिवाय एक्यूपंक्चर, फिजिओथेरपी, मसाज थेरपी याव्दारेही पाठीत मुंग्या येणे यावर उपचार होऊ शकतात. 


पाठीत मुंग्या येणे यावर घरगुती उपाय :- 

पाठीला मुंग्या येत असल्यास आयुर्वेदिक तेलाने पाठीला मसाज करावा. यासाठी तुम्ही महानारायण तेल, निर्गुंडी तेल, अश्वगंधा तेल, धनवंतरम तेल ह्यापैकी कोणत्याही आयुर्वेदिक तेलाचा वापर करू शकता. 

पाठीला मुंग्या आल्यास तेथे थोडे खोबरेल तेल लावून हलका मसाज करावा. यामुळे मुंग्या आलेल्या ठिकाणी रक्तप्रवाह वाढून हा त्रास कमी होतो.  

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स