जास्तवेळ एसीची हवा खाणंं ठरू शकतंं धोकादायक


         सध्या सगळीकडेच कडक उन्हाचा त्रास आपल्याला सहन करावा लागत आहे. त्यामुळे आपल्याला या उकाड्यापासून वाचणे आवश्यक असते. त्यातून आपण आपल्या आपल्या परीने उपाय करत असतो. अशावेळी आपल्यासाठी सोप्पा मार्ग असतो तो म्हणजे आपण आरामात आणि तासन तास एसीच्या खाली एका रुममध्ये बसून राहतो. आपण बाहेरून आल्यावर फार थकलेले असतो. तेव्हा आपल्याला थंडाव्याची आणि आरामाची गरज असते अशावेळी म्हणजे हेही आपल्या नकळत होऊ शकते. परंतु तुम्हाला जर का बराच वेळ असच एसीत बसण्याची सवय असेल तर तुम्हाला ही सवय वेळीच थांबवण गरजेचे आहे. 

       

       सतत एसीत बसल्याने तुम्हाला फुफ्फुसाचे आजार उद्भवण्याची शक्यता असते त्याचसोबत तुम्हाला अस्थमाचाहि त्रास होऊ शकतो तेव्हा अशावेळी तुम्हाला योग्य टी काळजी घेणे हे अनिवार्य असते. मुळात आपल्याला येणारा घाम आणि वाटणारा उकाडा दूर करण्यासाठी एसी महत्त्वाची भमिका बजावतो. आपल्याला त्याने चांगला आराम मिळतो आणि थंडावा मिळतो परंतु तुम्हाला माहितीय का की अस जास्तवेळ बसण तुमच्यासाठी घटक ठरू शकते. कारण तुम्ही एसीची हवा ही श्वासोच्छवासाद्वारे आट आणि बाहेर घेत असता. 


काय होतात परिणाम ? 

  • तुम्ही जर का जास्तवेळ एसीमध्ये बसत असाल तर तुम्हाला अनेक रोग होऊ शकतात. रात्री १६-१८ सेल्सिअस तापमान तुम्हाला झोपायची सवय असेल त्याचा परिणाम तुमच्या श्वसनावर होऊ शकतो. तुम्हाला वारंवार सर्दी होऊ शकते. त्याशिवाय अंगदुखीचाही त्रास वाढू शकतो. 
  • एसीमुळे ताजी हवा तुमच्या नाकावाटे जात नाही त्यामुळे तुम्हाला शुद्ध स्वच्छ हवा मिळत नाही. 
  • जास्तवेळ एसी मध्ये झोपल्याने श्वास कोंडल्यासारखा होतो. एवढेच नाही तर शरीराचे वजनही वाढते. तुम्हाला अनेक संसर्गजन्य रोगही होऊ शकतात. 
  • एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने एसीतील हवा ही खोलीत आर्द्रता शोषून घेते आणि त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होऊ शकतो. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स